बातम्या

दिवटे पाणंद रस्त्याची दुरुस्ती सुरू; शेतकऱ्यांची मागणी मान्य

Divate Panand road repair started Farmers'demand accepted


By nisha patil - 2/10/2024 4:33:41 PM
Share This News:



इचलकरंजी येथील टाकवडे रोड परिसरातील दिवटे पाणंद रस्ता अवकाळी पावसामुळे खराब झाला आहे या रोडवरून दररोज शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ये जा करावी लागते यामुळे तो रस्ता दुरुस्त करून मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते याची दखल घेऊन रस्त्याच्या कामाची सुरवात झाली आहे या ठिकाणी  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होतीत.


दिवटे पाणंद रस्त्याची दुरुस्ती सुरू; शेतकऱ्यांची मागणी मान्य