बातम्या
विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे विभागीय लोकशाही दिन रद्द
By nisha patil - 10/30/2024 7:30:04 PM
Share This News:
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली असून आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी सुरु आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने दरमहा दुसऱ्या सोमवारी होणारा विभागीय लोकशाही दिन नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार नाही. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर आयुक्त वर्षा लड्डा - ऊंटवाल यांनी केले आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे विभागीय लोकशाही दिन रद्द
|