बातम्या
विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे विभाग स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
By nisha patil - 1/3/2024 10:57:46 PM
Share This News:
आज विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे विभाग स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यशवंत पंचायत राज अभियान २०२०-२१ २०२१-२२, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि अमृत महा आवास अभियान यांचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार , श्री रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे, श्रीम याशनी नागराजन , मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, श्री विजय मुळीक उपायुक्त विकास आणि श्री राहुल साकोरे उपयुक्त आस्थापना यांच्या उपस्थितीत झुंबर हॉल विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडला
कोल्हापूर जिल्हा परिषदेस सन २०-२१ च यशवंत पंचायत राज अभियान मध्ये रुपये ३० लक्ष रक्कमच राज्यात प्रथम आणि रुपये १० लक्ष रुपयाचा सन २२-२३ च राज्यात द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जिल्हा परिषद कोल्हापूर क्या वतीने सदर पुरस्कार प्रकल्प संचालिका श्रीमती सुषमा देसाई व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा देसाई यांनी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप धनादेश प्रमाणपत्र आणि मानचिन्ह असे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि गडहिंग्लज पंचायत समितीला देखील पुरस्काराने सन्मानित क्रणेत आले. पंचायत समित्यांचे पुरस्कार कागल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सुशील संसारे आणि गडहिंग्लज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री शरद मगर यांनी स्वीकारल
अमृत महा आवास अभियानातल विभाग स्तरीय प्रधानमंत्री आवास योजना विभागात तूतीय आणि केंद्र पुरस्कृत आवास योजना विभागात द्वितीय पुरस्कार प्रकल्प संचालिका श्रीमती सुषमा देसाई यांनी स्वीकारला.
संत गाडगबाबां ग्राम स्वच्छता अभियनांतर्गत विभाग स्तरीय द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत वाटांगी तालुका आजरा याना प्राप्त झाला . सदर पुरस्कार आजरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री ढमाळ ग्रामसेवक सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी स्वीकारला
विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे विभाग स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
|