बातम्या
दिवाळी लक्ष्मीपूजन
By nisha patil - 12/11/2023 1:49:37 AM
Share This News:
लक्ष्मी पूजनाविषयी धार्मिक श्रद्धा: शरद पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. शरद पौर्णिमा म्हणजे नवरात्राैत्सवानंतर येणारा कोजागिरीचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला येतो. कार्तिक अमावस्येचा हा दिवस काली मातेचा असतो. या दिवशी काली मातेची पूजा होणे अपेक्षित असते. असे म्हणतात की, शरद पौर्णिमेचा म्हणेज धवल (प्रकाशाचा दिवस) लक्ष्मीचा आणि अमावस्येचा दिवस हा कालीमातेचा असतो. पण बदलत्या काळानुसार दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजाच केली जाते. आता तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाची प्रथाच रुढ झालेली दिसते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश , गणेश यांचीही पूजा केली जाते.
लक्ष्मीमाता प्रसन्न राहण्यासाठी घरातील लक्ष्मी( धन-पैसा-सोनं) याची पूजा केली जाते. यामध्ये वाढ व्हावी आणि आनंद कायम टिकून राहावा अशी मनोभावे प्रार्थना केली जाते.
दिवाळी लक्ष्मीपूजन
|