बातम्या

लोकमान्यच्या साथीने गुनिदास ची शनिवारी दिवाळी पहाट

Diwali Pahat on Saturday by Gunidas with Lokmanya


By nisha patil - 7/11/2023 9:22:07 PM
Share This News:



 गुणीदास फाउंडेशन आणि टोमॅटो एफ एम यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संगीत रसिकांच्या साथीने दरवर्षी दिवाळीचा पहाटेचा आनंद द्विगुणीत करण्याची परंपरा गुणीदास फाउंडेशनने गेली अनेक वर्ष जपली आहे. यंदाच्या दिवाळीत शनिवारी पहाटे सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय ख्वातीचे सुप्रसिद्ध कलाकार पार्श्वगायिक ऋषिकेश रानडे पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि अभिनेता विघ्नेश जोशी या  मैथिलीतून संगीत रसिकांच्या भेटीसाठी येणार आहे.ऋषिकेश रानडे यांनी अनेक मराठी हिंदी आणि कोकणी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्यासोबत मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गायिका आनंदी जोशी आपल्या सुरेल आवाजाची जादू पेश करणार आहे. दिवाळी पहाट हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने पणत्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. रसिकांना त्यामध्ये सहभागी होता येईल,त्यासाठी शनिवारी पहाटे साडेपाच वाजता रसिकांनी कार्यक्रमस्थळी यावे तसेच प्रवेशिका असणाऱ्या रसिकांना लकी ड्रॉमध्ये सहभाग घेता येणार आहे. मैफिलीचा आनंद लुटण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी पारंपारिक वेशभूषेत यावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गुणीदास फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.


लोकमान्यच्या साथीने गुनिदास ची शनिवारी दिवाळी पहाट