बातम्या

यशवंत ब्रिगेडमार्फत दीपावली भेट

Diwali gift through Yashwant Brigade


By nisha patil - 11/22/2023 4:47:08 PM
Share This News:



 मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली दहा वर्षापासून यशवंत ब्रिगेड व कोळेकर परिवारातर्फे ऊस तोड कामगार, विट भट्टी कामगार, झोपडपट्टीत राहणारे लोक, गोरगरीब लोकांना दीपावली फराळ व कपडे वाटप करण्यात येतात. याचबरोबर  शैक्षणिक वर्ष सुरू होताच गोरगरीब मुलांना  शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात येते . यातून एकच उद्देश आहे की या लोकांची दीपावली आनंदाने साजरी झाली पाहिजे. 

दहा वर्षापासून यशवंत ब्रिगेड व कोळेकर परिवारातर्फे ऊस तोड कामगार, विट भट्टी कामगार, झोपडपट्टीत राहणारे लोक गोरग,रीब लोकांना दीपावली फराळ व कपडे वाटप करण्याची  परंपरा  जपली आहे   याचबरोबर  शैक्षणिक वर्ष सुरू होताच गोरगरीब मुलांना  शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात येते शिक्षणाची गंगा या लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. हा उद्देश ठेवून हा उपक्रम केला जातो 

या उपक्रमाचे वेळी  यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष  संतोष कोळेकर यांनी . यशवंत ब्रिगेड हि संस्था . महिलांचे प्रश्न,मेंढपाळ प्रश्न, विद्यार्थी प्रश्न , धनगर आरक्षण अंमलबजावणीबाबत व वंचितांच्या हक्कासाठी आणि बहुजनांच्या न्यायासाठी प्रयत्न करत आली आहेअसे सांगितले 

.तसेच  या संस्थेच्या माध्यमातून सरकार दरबारी अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू. अशी ग्वाही त्यांनी दिली 
 यावेळी   संतोष कोळेकर, अमोल गावडे, प्रकाश गोरड, रावसो रानगे, प्रकाश पुजारी, विजय अनुसे, मल्हार येडगे, नामदेव लांबोरे, बाळासाहेब बरकडे, प्रियंका बरकडे, प्रा. डॉ शैलजा कोळेकर, दीपाली तलवार, वैशाली धुरगुडे आदी  उपस्थित होते


यशवंत ब्रिगेडमार्फत दीपावली भेट