बातम्या

आली आली दिवाळी आली घरोघरी लगबग वाढली

Diwali has come and it has grown close to home


By nisha patil - 6/11/2023 1:41:27 PM
Share This News:



अवघा आठ दिवसांवर आलेल्या दिवाळी सणासाठी खरेदीला महाद्वार रोडवर अनेक वस्तूसाठी वाव वाढला आहे काल रविवार सुट्टीचा अचूक मुहूर्त मिळाल्यामुळे गर्दीला उधाण आले होते विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक वस्तूंमुळे नागरिक मनसोक्त खरेदी करताना दिसत आहेत 

दिवाळीच्या आनंद उत्सवाला गुरुवारपासूनच प्रारंभ होत आहे नोकरदारांना पगार आणि बोनस मिळाल्यामुळे यंदा उत्सवाचा आनंद वेगळीच झाला आहे त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे 
       

विशेषता महाद्वार रोड ताराबाई रोड पापाची तिकटी लक्ष्मीपुरी राजारामपुरी सह गांधीनगर येथे खरेदीला खूप वाव मिळत आहे पणत्या आकाशकंदील दिवे सप्तरंगी रांगोळी फुले विविध फॅशनचे कपडे नेत्र दीपक फटाके चमचमीत तिखट आणि गोड फराळाचे पदार्थ सुगंध तेल उठणे साबण तर फटाके किल्ले मावळे या विविध वस्तूंचा यात समावेश आहे आकाश कंदीलाच्या झगमगाट संपूर्ण बाजारपेठेत असून पण त्या रंगीबेरंगी रांगोळी तोरण फुलांच्या मनाने बाजारपेठेची शोभा आणखीन वाढली आहे


आली आली दिवाळी आली घरोघरी लगबग वाढली