बातम्या
संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड
By nisha patil - 10/25/2023 10:35:54 PM
Share This News:
संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड
लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ८ कोटींची रक्कम जमा : अध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या यांची माहिती
इचलकरंजी : प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेच्या ३० हजार लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळवून देणार आणि त्यांची दिवाळी गोड करणार अशी घोषणा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या यांनी यापूर्वी केली होती. त्या अनुषंगाने त्याची पूर्तता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गतिमान सरकारने केली आहे व हा फंड आणण्यासाठी सरकारकडे खासदार धैर्यशील माने,आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्याकडे समितीने तगादा लावून हा ८ कोटींचा फंड समितीने खेचून आणला आहे.
इचलकरंजी ही कामगार नगरी असल्यामुळे जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी हे श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, संजय गांधी निराधार विधवा योजनेचे लाभार्थी आहेत. या गतिमान सरकारने दिवाळीपूर्वी हे पैसे ३१ मार्च २०२३ च्या लाभार्थ्यांना एप्रिलपासून सप्टेंबर पर्यंत व १३ फेब्रुवारी २०२३ च्या लाभार्थ्यांना मार्चपासून सप्टेंबर पर्यंतच्या फरकाची रक्कम देखील आता दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच नियमितपणे पेन्शनधारकांना जुलै ,ऑगस्ट ,सप्टेंबर महिन्याचे अनुदान देखील यापूर्वी प्रति व्यक्ती 1000 रुपये होते ते आज या गतिमान सरकारने प्रति व्यक्ती 1500 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये आठ दिवसात जमा होणार अशी माहिती संगांयो अध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या
यांनी दिली.यावेळी समितीचे a
सदस्य सुखदेव माळकरी ,सौ.सरिता आवळे ,कोंडीबा दवडते ,सलिम मुजावर ,जयप्रकाश भगत ,महेश ठोके,संजय नागुरे,महेश पाटील , तमन्ना कोटगी आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड
|