बातम्या

निरोगी चेहऱ्यासाठी करा ‘फेस योगा’

Do Face Yoga for a healthy face


By nisha patil - 9/3/2024 7:26:05 AM
Share This News:



शरीर निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारची योगासने केली जातात. त्याच प्रकाणे चेहरा निरोगी ठेवण्याठीही फेस योगा हा उत्तम मार्ग आहे. पूर्ण शरीराची काळजी आपण घेतोच. परंतु, त्याच बरोबर चेहऱ्याची काळजी घेणेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शरीर आतून खराब असेल तर त्याचा प्रथम परिणाम चेहऱ्यावर दिसतो. तणाव असल्यास तो चेहऱ्यावरून समजतो. म्हणूनच इतर योगाप्रमाणेच फेस योगा उपयोगी ठरतो. महत्वाचे म्हणजे फेस योगा तुम्हाला कुठेही करता येतो. अगदी ऑफिसमध्येही बसल्या जागी तुम्ही हा योगा करू शकता.

फेस योगामुळे चेहरा निरोगी राहतो. रोज हा योगा १५ ते २० मिनिटे केल्यास ते फायदेशीर ठरते. फेस योगा चेहऱ्यावरील मांसपेशींना मजबूत बनवतो. त्याचसोबत त्वचा तजेलदार होते. तणाव, काळजीमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग, सुरकुत्या निघून जातात. विशेष म्हणजे चेहरा तणावमुक्त दिसतो. वॉटर थेरपीप्रमाणे फेस योगासुद्धा बहुपयोगी आहे.

फेस योगाचे विविध प्रकार असून त्याची माहिती आपण येथे घेणार आहोत. यापैकी एक म्हणजे ‘सॅश माऊथ एक्सरसाइज’ होय. हा योगा करताना आरामाच्या मुद्रेत बसावे. श्वासावर घेत प्रथम उजव्या बाजूचा गाल फुगवावा आणि नंतर डावा गाल फुगवावा. वीस वेळा ही प्रक्रिया करावी. दोन्ही बाजूंनी हे करावे. इन्व्हर्टेड पोज या प्रकारात उभे राहून दोन्ही पायांत अंतर घ्यावे. श्वास खेचत समोरील बाजूस वाकावे. दोन्ही हातांतील अंगठा आणि मधले बोट हनुवटीवर ठेवावे. ५ ते १० सेकंदांपर्यंत ही प्रक्रिया करावी. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. दिवसातून दहा वेळेस हा व्यायाम करावा.


स्मायलिंग फिश फेस हा योगा करताना आराम मुद्रेमध्ये बसून चेहऱ्याला माशाप्रमाणे बनवावे. ओठांना खालील बाजूस ताणावे. नंतर गालांमध्ये ताणासारखे जाणवेल. त्यामुळे गालांमधील सगळ्या मांसपेशी टोन अप होतात. लाफिंग आऊट-लाऊड फेस हा फेस योगा करताना जमिनीवर सरळ बसावे. हसता हसता दोन हातांच्या बोटांना हनुवटीच्या खाली ठेवावे. जोर देत गालांवर दाबावे. या अवस्थेत ५ ते १० मिनिटांपर्यंत थांबावे. त्यामुळे गाल प्रफुल्लित दिसतात आणि चेहऱ्यावरील तणाव नाहीसा होतो. अशा प्रकारे फेस योगा नियमितपणे केल्यास चेहरा निरोगी आणि तजेलदार होतो.


निरोगी चेहऱ्यासाठी करा ‘फेस योगा’