बातम्या

कळंबा तलाव संवर्धन काम दर्जेदार व जलदगतीने करा -आमदार सतेज पाटील यांच्या अधिकाऱ्याना सूचना

Do Kalamba lake conservation work with quality and speed


By nisha patil - 11/7/2024 8:28:40 PM
Share This News:



१४१ वर्षे पार केलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम नैसर्गिक अधिवासाला धोका न पोहचवता दर्जेदार पद्धतीने आणि जलद गतीने पूर्ण करा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला आहे.  या तलावाच्या मनोऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामाची आमदार पाटील यांनी पाहणी केली.

करवीर तालुक्यातील कळंबा येथे १८८३ साली बांधून पूर्ण झालेल्या ऐतिहासिक कळंबा तलावातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो.  या तलावाच्या मनोऱ्याची पडझड झाली असून बंधारेही कमकुवत झाले होते. दुरावस्था झालेल्या या तलावाच्या  संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी तसेच  पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ४.५0 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.  काही तांत्रिक कारणांमुळ हे काम थांबले होते.  मात्र आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम पुन्हा सुरू झाले आहे. यामध्ये  मनोऱ्याची दुरुस्ती, जॅकवेल नूतनीकर, फरशी काम, दगडी पिचिंगद्वारे बंधाऱ्याचं मजबुतीकरण, पेविंग ब्लॉक, पक्षी निरीक्षण केंद्र, चिल्ड्रन पार्क, हिरवळीसह बगीचा,  विद्युत रोषणाईसह लोखंडी फॅब्रिकेशन या कामांचा समावेश आहे. 

      या तलाव परिसरातील मनोऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या संवर्धन कामाची पाहणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली . हे काम चांगल्या दर्जाचं आणि जलद गतीन पूर्ण करावे, नैसर्गिक अधिवासाला कोणताही धोका न पोहोचू देऊ नका  अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वैभव जाधव यांना केल्या. 

    यावेळी कळंबा सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच सोनल उर्फ नितीश शिंदे, ग्रा. प. सदस्य विकास पोवार - बावडेकर, संदीप पाटील, रोहित मिरजे , उत्तम जाधव यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .


कळंबा तलाव संवर्धन काम दर्जेदार व जलदगतीने करा -आमदार सतेज पाटील यांच्या अधिकाऱ्याना सूचना