बातम्या
उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’
By nisha patil - 3/21/2024 7:44:39 AM
Share This News:
भारतीय योगशास्त्र खूप प्राचीन असून यामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय सांगितला आहे. प्रत्येक समस्येवर योगासन असून ते नियमित केल्यास ती समस्या हळूहळू कमी होत जाते. मनशांती, निरोगी शरीर यासाठी योगासने आहेतच, पण उंची वाढविण्यासाठी सुद्धा योगासन आहे.
उंची वाढविण्यासाठी ताडासन केले जाते. ताडासनामुळे उंचीत वाढ होते. बाल, कुमार आणि किशोरांसाठी हे आसन खूप लाभदायक आहे.ताडासान खूप सोपे असून ते करण्यासाठी प्रथम सरळ दोन्ही पायांवर सारखा भार टाकून उभे राहा. पाय जुळालेले असू द्या. शरीर स्थिर असू द्या. श्वासावर ध्यान केंद्रित करा. हळूवारपणे दोन्ही हात वरच्या दिशेने न्या. श्वास घेत हात वरच्या दिशेने खेचा. चवड्यांवर उभे राहा. शरीराचे संतुलन साधा. या स्थितीत काही काळ थांबा. श्वास कोठेही रोखून धरू नका. सावकाश पूर्वस्थितीत यावे.
हे आसन अभ्यासाने अधिक काळापर्यंत करता येते. सुरुवातील अर्धा मिनिटापर्यंत हे आसन करावे. हे आसन पाच ते दहा वेळा करता येते. ताडासनाचे विविध लाभ आहेत. हे आसन केल्याने पायांची बोटे आणि पिंडर-यांचे स्रायू सशक्त होतात.छाती, खांदे, पाठ येथी स्रायू सशक्त बनतात. ताडासनामुळे पाठीच्या मणक्याला व्यायाम मिळतो, त्यामुळे उंची वाढायला मदत होते आणि स्लीप डिस्कसारखे आजारही दूर पळतात.
उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’
|