बातम्या
सकाळी उठताच करा 'हे' 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे
By nisha patil - 4/6/2023 8:08:42 AM
Share This News:
जीवनात प्रगती करायची असेल तर आपल्या दिनचर्येत शास्त्रानुसार बदल केले पाहिजेत.
यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सर्व बिघडलेली कामे मार्गी लागतात. यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात.
1. हाताचे तळवे पहा
सकाळी उठताच हाताच्या तळव्याचे दर्शन घ्या. असे केल्याने लक्ष्मीमाता, सरस्वती माता आणि भगवान विष्णुंची कृपा आपल्यावर कायम राहते.
2. धरणी मातेला नमस्कार
सकाळी झोपेतून उठल्यानंतर धरणी मातेला नमस्कार करत तिची क्षमा मागा. असे म्हटले जाते की धरणीवर पाय ठेवल्याने दोष लागतो. भगवान श्रीकृष्ण सुद्धा धरणी मातेला नमस्कार करून क्षमा मागत असत.
3. सूर्यदेवाला अर्ध्य द्या
सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर सूर्य देवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा. यामुळे सर्व दोष नष्ट होतात. कुटुंब, समाजात मान-सन्मान वाढतो.
4. घरातील मंदिर व्यवस्थित असावे
घरातील मंदिर व्यवस्थित असावे. देवी-देवतांच्या प्रतिमा आणि पूजा साहित्य व्यवस्थित ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा कायम राहते. कुंडली दोष शांत होतो.
5. पहिली चपाती गाईसाठी बनवा
जेवण बनवताना पहिली चपाती गाईसाठी बनवा. नंतर ती गाईला खाऊ घाला.
6. आई-वडिलांचे चरणस्पर्श करा
घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिल आणि ज्येष्ठांचे चरणस्पर्श करा. यामुळे देवाची कृपा राहते. कामात यश येते.
7. गोड दही खाऊन निघा
सकाळी जेव्हा घरातून कामासाठी निघाल तेव्हा गोड दही खाऊन निघा. यामुळे मन शांत राहते. शरीरात ग्लूकोज तयार होते.
सकाळी उठताच करा 'हे' 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे
|