विशेष बातम्या

काळे डाग सतावतात ? तुमच्या किचनमध्येच आहे त्यावर बेस्ट उपाय

Do black spots bother you


By nisha patil - 6/23/2023 7:18:16 AM
Share This News:



उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या गरमीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स (pimples) येणे, मुरुमे यांचा त्रास बऱ्याच जणांना होतो. तो खूप सामान्य आहे.

तुम्ही त्वचेची नीट काळजी घेत असाल तर मुरुमे वगैरे कमी तर होतात पण त्यांचे डाग चेहऱ्यावर कायम रहातात. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यातही बाधा येते. तुम्हालाही चेहऱ्यावरील अशा डागांमुळे त्रास होत असेल तर स्वयंपाकघरात हमखास आढळणारी एक गोष्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. तो पदार्थ म्हणजे टोमॅटो (tomato). हा असा पदार्थ आहे जो सर्वांच्याच घरात नेहमी असतो. टोमॅटोचा वापर हा चेहऱ्यावरील डाग तर दूर करतोच पण तुमच्या स्किनचा रंगही सुधारतो.

टोमॅटोचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

टोमॅटोचा रस

चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा मुरूमं यांचे डाग घालवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावू शकता. यासाठी एका वाटीत टोमॅटोचा रस घ्या आणि तो कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याला 5 मिनिटं मसाज करा. नंतर थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून टाका. यामुळे मुरूमांची समस्याही दूर होण्यास मदत होईल.

दही व टोमॅटो

टोमॅटोचा रस आणि दही हे एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि मुरुमांच्या खुणा दूर होण्यास मदत होते. होतात. कारण दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे खोलपर्यंत जाऊन त्वचा आतून स्वच्छ करतात. याचा वापर करण्यासाठी एका वाटीत दोन चमचे टोमॅटोचा रस घेऊन त्यामध्ये दोन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करून चेहऱ्यावर नीट लावावे. आणि 15 मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.

टोमॅटो आणि मधाचा एकत्र वापर

मधामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास प्रतिबंध होतो व डागही कमी करण्याचे काम मध करतो. म्हणूनच तुम्ही टोमॅटो आणि मध एकत्र चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये थोडा टोमॅटोचा रस घेऊन त्याता एक चमचा मध घालून नीट मिक्स करा आणि हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.


काळे डाग सतावतात ? तुमच्या किचनमध्येच आहे त्यावर बेस्ट उपाय