चहा प्यायल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, होऊ शकतं नुकसान

Do not accidentally drink water after drinking tea it may cause damage


By nisha patil - 4/6/2023 8:09:36 AM
Share This News:



अनेकदा तुम्ही घरातील वडीलधार्‍यांचे म्हणणे ऐकले असेल की चहा पिल्यानंतर पाणी पिऊ नये. आपण याकडे मिथ म्हणत दुर्लक्ष करतो, पण असं करणं खरोखरच हानिकारक आहे.

चहा पिल्यानंतर पाणी प्यायल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होतो शिवाय त्यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. चला जाणून घेऊया चहानंतर पाणी पिण्यास का मनाई आहे आणि त्याचे काय तोटे असू शकतात. (Health Tips)

दातांना नुकसान

चहा पिल्यानंतर पाणी पिल्यानं दात खराब होतात. चहानंतर पाणी पिण्याचा थेट परिणाम आपल्या दातांवर होतो. गरम पदार्थ पिल्यानंतर थंडं पदार्थ पिल्यानं दातांच्या बाहेरील थरावर म्हणजेच इनॅमलवर परिणाम होतो. खरंतर इनॅमल हे दातांसाठी एका ढाल प्रमाणं काम करते आणि त्याला गरम आणि मग थंड या सगळ्याचा त्यावर परिणाम होतो. त्यामुळे दातांना अनेक समस्याही होऊ शकतात.

अल्सरचं कारण

चहा पिल्यानंतर पाणी पिणं देखील पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. यामुळे अल्सरचा धोका वाढतो. चहा पिल्यानंतर थंड पाणी प्यायल्यानं अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. हा त्रास सतत होत राहिल्यास अल्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.


चहा प्यायल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, होऊ शकतं नुकसान