बातम्या

रात्रीच्या वेळी चुकूनही खावू नका काकडी, आरोग्याला हानिकारक

Do not accidentally eat cucumber at night harmful to health


By nisha patil - 8/3/2024 7:40:10 AM
Share This News:



काकडीत अनेक पोषक तत्वे असल्याने ती आरोग्यासाठी चांगली आहे. सलाडमध्ये काकडीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. काकडी शरीर आणि मेंदूसाठी खूप फायद्याची आहे. परंतु, काकडी रात्री खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अनेकांना वाटते की, काकडीचे सहजपणे पचन होते. परंतु तसे नाही.

काकडीत ९५ टक्के पाणी असल्याने रात्री जास्त काकडी खाल्ल्यास पोट बराच काळ भरलेले राहते आणि जड झाल्यासारखे वाटते.काकडी जड असल्याने रात्रीच्या वेळी खाल्ल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्यास काकडीतील पाण्यामुळे रात्री झोपेदरम्यान अनेकदा लघुशंका होऊ शकते. यामुळे सतत झोपमोड होऊ शकते.

काकडी योग्य पद्धतीने खाल्ल्यास चांगले पचन होते. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. काकडीत भरपूर पाणी असल्याने वरून पाणी प्यायल्यास काकडीतील पोषक द्रव्ये नष्ट होतात. त्यामुळे काकडी सेवन केल्याचा उपयोग होणार नाही.


रात्रीच्या वेळी चुकूनही खावू नका काकडी, आरोग्याला हानिकारक