बातम्या

सप्तपर्णीचा गैरसमजातून बळी नको

Do not fall prey to Saptaparni through misunderstanding


By nisha patil - 6/11/2023 9:10:13 PM
Share This News:



सप्तपर्णीचा गैरसमजातून बळी नको

वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांचे नागरिकांना आवाहन

सातवीन (सप्तपर्णी ) हवीय जागृती

बहुगुणी सप्तपर्णी वृक्षाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवले जात आहेत. यामुळे अनेक शहरात या वृक्षाची तोड सुरू आहे. सप्तपर्णीबद्दल विविध प्रकारचे गैरसमज पसरविले जात आहेत. वास्तविक त्वचारोग, पोटदुखी, मलेरिया यावर उपयोगी असलेल्या आयुर्वेदिक अशा या सप्तपर्णी वृक्षाची तोड करू नका, असे आवाहन ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे.

सध्या सप्तपर्णी वृक्ष सर्वत्र बहरला आहे. याला 'सातवीण' किंवा 'सप्तछदा' या नावानेही ओळखतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बहर आल्यानंतर पुढील महिनाभर त्याच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळतो.


सप्तपर्णीचा सुवास तीव्र असल्यामुळे डोकेदुखी, श्वसन विकार, घसा दुखणे, मळमळणे, उलटी होणे,खोकल्याचा त्रास होत असल्याचा गैरसमज पसरत आहे. सप्तपर्णीच्या झाडावर पक्षी आसरा घेत नाहीत, जनावरे याचा पाला खात नाहीत, हे वृक्ष अतिशय घातक वायू सोडतात, यामुळे मानवाच्या आरोग्याला हानीकारक आहे. याच्या वायूमुळे अल्सर व कॅन्सर होतो. हा विदेशी वृक्ष असून, पर्यावरणाला घातक असल्याची अशास्त्रीय चर्चा केली जात आहे. वास्तविक असा कोणताही रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेला किंवा वैद्यकीय अहवाल नसल्याचे डॉ. बाचुळकर यांनी स्पष्ट केले आहे.सप्तपर्णा देशी वृक्ष असून आयुर्वेदानुसार त्वचारोग, अग्रिमांद्य, अतिसार, पोटविकारावर गुणकारी आहे. याची साल, पाने, मुळे, चीक औषधात वापरतात. भूक वाढते, व्रण व दंतक्षयावर उपयोगी आहेत. डिटॅमाईन व इकायटामॉईन ही अल्कलॉईड असलेली साल यकृत रोगावर उपयोगी असल्याचे डॉ. बाचुळकर यांनी सांगितले.
       
ज्यांना सप्तपर्णीचा दरवळ सहन होत नाही त्यांनी झाडांजवळ जाऊ नये, मास्क घालावा. अशी झाडे दाट लोकवस्तीत न लावण्याची काळजी जिल्हापरिषद,नगरपालिका,महानगरपालका प्रशासनाने घ्यावी. असे आव्हान डॉ मधुकर बाचुळकर वनस्पती तज्ञ यांनी केले आहे


सप्तपर्णीचा गैरसमजातून बळी नको