बातम्या
दंड वसूल होत नाही तोपर्यंत संबंधित खान मालकांना गौण खनिज उत्खन परवानगी देऊ नका -सतिश माळगे.
By nisha patil - 8/17/2023 11:21:53 PM
Share This News:
प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुहास गाडे यांच्या कार्रकीर्दीमध्ये हातकणंगले तहसीलदार विभागांमध्ये शासनाचा महसूल बुडवून ज्यांनी बेकायदेशीर गौण खनिजांचे उत्खनन करून विक्री केली त्या सर्व खनमालकांचे वर रक्कम रुपये 231 कोटी अंदाजे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्याबाबत त्वरित योग्य ती कारवाई करून दंड वसूल करण्यात यावा जोपर्यंत दंड वसुल होत नाही तोपर्यंत संबंधित मालकांना पुन्हा उत्खनाची परवानगी देऊ नये ज्या खनमालकांवर दंडात्मक कारवाई झालेली अशा खन मालकांकडून तात्काळ दंड वसूल न केल्यास आपल्या कार्यालयासमोर पंधरा दिवसानंतर रिपब्लीकन पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा रिपब्लीकन पक्षाच्या वतिने हातकणंगले चे तहसिलदार मा.कल्पना ढवळे मॅडम यांना निवेदनाद्वारे सतिश माळगे यांनी दिला. यावेळी शिरीष थोरात,सुहास कांबळे,गणेश माळगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते
दंड वसूल होत नाही तोपर्यंत संबंधित खान मालकांना गौण खनिज उत्खन परवानगी देऊ नका -सतिश माळगे.
|