बातम्या

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा- आमदार ऋतुराज पाटील

Do politics on stray dogs Patil Rituraj Patil


By nisha patil - 5/3/2024 7:27:02 PM
Share This News:



भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा- आमदार ऋतुराज पाटील

-महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक
-डॉग व्हॅन वाढविण्या बरोबर स्वतंत्र निवारा व्यवस्था करा

कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन  आमदार ऋतुराज पाटील यांनी  कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी  यांना दिले. आ.पाटील यांनी के.मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत तातडीची बैठक घेतली.  या बैठकीत  कुत्र्यांना पकडण्यासाठी बाहेरून डॉग कॅचर मागवणे, डॉग व्हन वाढविणे आणि स्वतंत्र शेल्टर तयार करण्यासाठी प्रयत्न करावे,  अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या.

कोल्हापूर शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने  रेबीज होऊन  एका तरुणीचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन   भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात ही बैठक घेण्यात आली..

 यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना करणार असा सवाल केला. हा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे तत्काळ ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.यासाठी लागणारा निधी व इतर मदतीबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करू. प्रशासनाने याबाबत त्वरित पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना आमदार पाटील यानी केल्या.

चर्चेदरम्यान महापालिका  अधिकाऱ्यानी कायद्याच्या मर्यादा, कुशल मनुष्यबळाची कमतरता आदी विषयांकडे लक्ष वेधले. 

माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी अभिजित चौधरी आयुक्त असताना केरळहून प्रशिक्षित डॉग कॅचर मागवले होते असे सांगत अशा प्रकारच्या उपायोजना करण्याची सूचना केली.

माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास आम्ही ही  कुत्री पकडून ती संबंधित अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये सोडू असा इशारा दिला.


यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक अर्जुन माने, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे, प्रतापसिंह जाधव, दुर्वास कदम, इंद्रजित बोंद्रे, मोहन सालपे, राजू साबळे, संजय भोसले, लाला भोसले, राजाराम गायकवाड, शिवानंद बनछोडे, अक्षय शेळके, दिपक थोरात, उमेश पाडळकर, यश शिर्के, रोहित गाडीवडर तसेच एनएसयूआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिकेतील संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.


भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा- आमदार ऋतुराज पाटील