रोग, तणावमुक्तीकरिता नियमित करा मुद्रांद्वारे प्राणायाम
By nisha patil - 6/24/2023 8:43:05 AM
Share This News:
जर नियमित योगसाधना आणि प्राणायाम केला तर त्यापासून फायदाच मिळतो. त्याचप्रमाणे फार पुरातन कालापासून मुद्रा शास्त्र हे देखील चांगल्याप्रकारे विकसित झाले.या मुद्रांसमवेत प्राणायामाचे विविध प्रकार केले असता आपले विविध आजार बरे व्हायला मदत होते.म्हणून योगसाधकांनी मुद्रा प्राणायामही नियमित करावा.
तो नियमित करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ आजार अजिबात फिरकत नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आजारातही हे मुद्रा प्राणायाम आपल्याला तो आजार बरा करायला मदतच करतात.
बुद्धिवर्धक ज्ञानमुद्रा
या मुद्रेने चंचलपणा कमी होतो. निद्रानाशाचा विकार बरा होतो. स्वभाव शांत होतो. एक तासापर्यंत या मुद्रेत बसता येते. हळूहळू कालावधी वाढवावा आणि आपल्या जीवनातील ताणतणाव कमी करावा.
मनोविकारावर करा वायुमुद्रा
रागावर विजय मिळविणारी ही विजय मुद्रा आहे. जर मान लचकली असेल तेव्हा कोणताही मानसिक आजार असेल तर ही मुद्रा नियमित रोज करावी. पाय मुरगळला तरी ही मुद्रा करणे प्रभावी ठरते.
सांधेदुखीवरील नियमित उपाय आकाशमुद्रा
आखडलेला सांधा या मुद्रेने बरा होतो. आकाशमुद्रा जर नियमित केली तर आपली हाडे बळकट रहातात. सांधे मोकळे होतात. अशी ही आकाशमुद्रा प्रत्येकाने रोज करावी.
शून्यमुद्रा कानदुखीवर प्रभावी
जर कान दुखत असेल तर ही शुन्य मुद्रा रोज नियमित करावी. हिचा कालावधी आहे अर्धा तास. रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास ही मुद्रा करावी म्हणजे अकाली बहिरेपणा येत नाही.
सूर्यमुद्रा स्त्रियांची मासिक पाळी
सूर्याप्रमाणे तेजस्वी उर्जास्त्रोत शरीरात निर्माण होतो. या मुद्रेमुळे चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रियांच्या मासिकपाळीच्या विकारात तसेच पोटदुखी, कंबरदुखीवर, मानसिक ताणावर सूर्यमुद्रा प्रभावी आहे.
पृथ्वीमुद्रा उत्साह प्रदान करणारी
आपला थकवा घालवून आपल्याला उत्साह प्रदान करणारी ही पृथ्वीमुद्रा आहे. वयोमानामुळे काम होईनासे होते. अशावेळी जर नियमित पृथ्वीमुद्रा केली तर जीवनात उत्साह वाढतो थकवा कमी होतो.
पित्त व गॅसेससाठी वरूणमुद्रा
ज्यांना कोणाला ऍसिडीटीचा त्रास होत असेल त्यांनी जलतत्वाचे प्रतिनिधीत्व करणारी ही वरूणमुद्रा नियमित धारण करावी. त्वाचारोगही नाहीसे करते. खाज,कंड बरा करते.वाढलेले वजन कमी करते.
जलोदरनाशक मुद्रा किडनीविकारांवर उपयुक्त
काहीवेळी पाणी साठून पोटाचा आकार वाढलेला असतो. तसेच हत्तीरोग होतो. किडनीवर ताण येऊन ती सूजते. अशावेळी शरीरातील विषारी द्रव्यांचे प्रमाणही वाढलेले असते. पण न घाबरता जर नियमित जलोदरनाशक मुद्रा धारण केली तर त्याचा फायदाच होतो.
नवचैतन्य देणारी प्राणमुद्रा
ही मुद्रा नियमित केल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. शरीर बलवान होते, आळस, कंटाळा, निरूत्साह जातो. कार्यशक्ती वाढते. रक्तप्रवाह सुरळीत होतो. जलतत्व आणि पृथ्वीतत्व एकत्र येऊन आपल्याला जगायला टॉनिक मिळते.
अपानमुद्रा हृदयविकारग्रस्तांसाठी
युरिनरी इन्फेक्शन कमी होते. मुळव्याधीचा त्रास कमी होतो. याच्या जोडीला प्राणायाम केला असता शरीराला योग्य परिणाम होतो म्हणून मधुमेहींनीसुद्धा ही अपानमुद्रा रोज करावी.
मधुमेहींसाठी शंखमुद्रा
कंबरेच्या खालच्या सर्व अवयवांवर शंखमुद्रेचा परिणाम होतो. नाभीचक्र, पोटातील लहान व मोठे आतडे, यांचे कार्य सुधारते. तसेच थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते. गायकांनी व सतत बोलणाऱ्यांनी आपला आवाज राखण्यासाठी ही मुद्रा रोज करावी.
सहजशंख मुद्रा लघवीच्या व शौचाच्या तक्रारीवर
मुलबंध बांधताना जी शंखमुद्रा केली जाते तीच सहजशंखमुद्रा होय. शक्यतो वज्रासनात करतात. यामुळे गुदद्वाराचे स्नायू बळकट होतात. षड्रिपूंवर विजय मिळविणारी मुद्रा होय.
लिंगमुद्रा खेळाडूंना प्रिय अशी
ही मुद्रा उभे राहून करावी किंवा पद्मासनात बसून करावी. यामुळे प्रत्येक पेशींपर्यंत प्राणवायू जातो. तसेच पाठीच्या कण्याचे विकार होत नाही.
कमलमुद्रा एकटेपणात करावयाची मुद्रा
डाव्या हाताने पृथ्वीमुद्रा व उजव्या हाताने ध्यानमुद्रा करून निराशा व एकटेपणावर मात करता येते. पाच वेळा दीर्घश्वसन करावे. पाचही बोटे व तळहाताचा खालचा भाग एकमेकांना चिकटवून कमळाचा आकार करावा. तर्जनी, मध्यमा, अनामिका ही बोटे उघडून बाहेरच्या बाजूला ताणून धरावी.
अध्यात्मिक प्रगतीसाठी नागमुद्रा
डाव्या हाताची बोटे उभी ठेवून उजव्या हाताच्या बोटांनी ती बोटे क्रॉस धरावीत व अंगठ्याने अंगठा दाबावा. ही मुद्रा केल्यामुळे मुलाधार व स्वादिष्ठान चक्रामध्ये ज्ञानाग्नि प्रज्वलित होतो.
रोग, तणावमुक्तीकरिता नियमित करा मुद्रांद्वारे प्राणायाम
|