बातम्या
शांत झोप लागण्यासाठी करा हे सिंपल ‘४’ उपाय
By nisha patil - 1/20/2024 7:35:35 AM
Share This News:
पुर्वी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे त्यामुळे त्यांची जीवनशैली एकदम छान होती. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस दिवसभर दगदग करुन दमत असतो. माणसाला कामामुळे शारीरिक व मानसिक टेन्शन असते. त्यामुळे माणूस शरीराने ही आणि मनानेही दमून जातो. यासाठी त्याला शांत झोप आवश्यक असते पण काहीवेळा असे होते की, माणूस खूप दमलेला असताना त्याला शांत झोप लागत नाही. मग याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होण्यास सुरुवात होते.
दिवसभर धावपळ आणि काम केल्यानंतर रात्री शांत पडावे असे सगळ्यांना वाटत असते. परंतू दिवसभरातील काही चूकीच्या सवयी किंवा खाण्या-पिण्याच्या सवयींमूळे रात्री थकूनही झोप येत नाही. यामुळे मग मध्यरात्री जाग येणे, झोप न लागणे अशा समस्या वाढू लागतात. काही लोक यावर उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या देखील घेतात पण या गोळ्या घेण्याआधी याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. हे आपण जाणून घेत नाही. यावर वेळीच उपचार केले नाही तर आरोग्यावर परिणाम होऊ लागतात.
यावर उपाय म्हणून योगा केल्याने ताण हलका होतो हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे शरीरातील मानसिक ताणतणाव कमी झाल्यास शांत झोप लागते. त्यासाठी काही हलकी योगासने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर श्वसनावर नियंत्रण मिळवल्याने झोप येण्यास मदत होते. यामुळे शरीरामध्ये कार्बनडायऑक्साईड साचून राहतो आणि ताण हलका होण्यास मदत होते.पडल्या-पडल्या झोपण्यासाठी हा श्वसनाचा व्यायाम स्टेप बाय स्टेप असा करा
१. उजव्या कुशीवर झोपा.
२. डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या.
३. शक्य तितका वेळ श्वास रोखून ठेवा. सुरुवातीच्या काळात श्वास काही सेकंदच रोखणे शक्य होईल. हळूहळू तुम्ही १०-१५ सेकंद श्वास रोखणे शक्य होईल.
४. हा प्रयोग नियमित रात्री झोपण्यापूर्वी ५ ते ६ वेळेस केले तर तुमच्या झोपेच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
शांत झोप लागण्यासाठी करा हे सिंपल ‘४’ उपाय
|