बातम्या

सकाळी लवकर जाग येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, पहाटे येईल जाग

Do these things to wake up early in the morning


By nisha patil - 2/26/2024 7:39:19 AM
Share This News:



सकाळी लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते, असे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती तसेच तज्ज्ञ सुद्धा सांगतात. परंतु, सकाळी जागच येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. त्यामुळे इच्छा असूनही सकाळी लवकर उठता येत नाही. सकाळी लवकर उठायचे असेल तर काही गोष्टींचे पालन केले पाहिजे. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.

रात्री वेळेत झोपा
रात्री ठरवून वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठा.

सवय बदला
रात्री उशीरा झोपण्याची सवय बदला. रात्री झोप येत नसेल तर एक ग्लास कोमट दूध घ्या. शतपावली करा.


प्रयत्न करा
प्रयत्न करूनही सकाळी जाग आली नाही तर लगेच धीर सोडू नका. आठवडाभर प्रयत्न केल्यास लवकर उठण्याची सवय लागेल.

प्रथम छोटे ध्येय
पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनीटे आधी झोपा व नंतर १५ मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. अशी वेळ वाढवत न्या.

दुपारची झोप टाळा
दुपारी झोपू नका. अन्यथा रात्री लवकर झोप येणार नाही. पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही.

वातावरण निर्मिती
रात्री लवकर झोप लागण्यासाठी पुस्तके वाचा किंवा सुवासिक चहा घ्या. शांतता मिळेल अशी एखादी गोष्ट ठरवून रोज रात्री करा.

कामाचे नियोजन
आठवडाभराच्या कामाचे नियोजन करा. रोजच्या कामामध्ये तुम्हाला उत्साहीत करणारी कामे सकाळी सकाळसाठी ठरवा.


सकाळी लवकर जाग येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, पहाटे येईल जाग