बातम्या

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Do this home remedy if you are suffering from sweating in summer


By nisha patil - 3/18/2024 7:25:36 AM
Share This News:



उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास असह्य होतो. कडक उन आणि आद्र्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. यापासून त्रासपासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास घामोळ्यांचा त्रास आपोआपच कमी शकतो.
 

घामोळ्यांमुळे त्रास होत असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्यावीत आणि ते पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करावी. यामुळे घामोळ्या लवकर दूर होतील.

चंदन पावडर लावल्यानेही घामोळ्या दूर होतील. पावडरप्रमाणे शरीरावर लावावे. चंदन पावडर पाण्यात घोळून याचा लेप घामोळ्यांवर लावू शकता. शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी उपयोगी आहे. घामोळ्यांपासून बचावाचा हा चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाका आणि या पाण्यात काकडीचे पातळ तुकडे कापून टाकावेत. यानंतर हे तुकडे घामोळ्यांच्या जागेवर लावल्याने घामोळ्या लवकर बऱ्या होतात.

घामोळ्यांवर मुलतानी मातीचा लेप लावल्यानेही आराम मिळतो. यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून त्याचा लेप तयार करावा. हा उपाय केल्यास घामोळ्यांमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होते. कोरफडीच्या पानांचा लेप दिवसातून दोनवेळा घामोळ्यांवर लावल्यानेही फायदा होतो. लहान बाळाला घामोळ्या झाल्यास त्याची अंघोळ घातल्यानंतर टॉवेलऐवजी हवेद्वारे त्याची त्वचा वाळू द्या. बाळाला कॉटन किंवा मखमलीचे हलके कपडे घाला.


यामुळे घामोळ्या बऱ्या होतात. आणखी एक उपाय म्हणजे कच्च्या आंब्याचा आहे. हा उपाय करण्यासाठी कच्चा आंबा मंद आचेवर भाजून घ्यावा व त्यातील गर काढून तो शरीरावर लेपासारखा लावावा. हा उपाय केल्यास घामोळ्या दूर होतील. कच्चा आंबा शरीराची उष्णता थंड करण्यामध्ये लाभदायक आहे. खोबरेल तेलात कापूर मिसळून घामोळ्यांवर लावल्यास चांगला अराम पडतो.


उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय