बातम्या

पावसाळ्यामध्ये केस गळत असतील तर करा 'हे' घरगुती उपाय

Do this home remedy if your hair is falling during monsoons


By nisha patil - 8/8/2023 7:40:55 AM
Share This News:



सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना भिजायला खूप आवडते. त्यामुळे लोक सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत फिरायला जातातच.

अशावेळी ते मनसोक्त पावसाचा आनंद घेतात. पण पावसात भिजल्यानंतर केसात कोंडा होणे किंवा केसांमध्ये खाज सुटणे अशा समस्या निर्माण होतात. अनेक उपाय करूनही अशा प्रकारच्या समस्यांपासून सुटका होत नाही. तर आता आपण अशाच काही गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोक्यातील खाज कमी होण्यास मदत होईल.

1. लिंबू – लिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात. लिंबूच्या मदतीने आपण आपल्या डोक्यातील खाज दूर करू शकतो. त्यासाठी एक चमचा लिंबूचा रस घ्या आणि एक कप पाणी घ्या. लिंबूचा रस पाण्यात मिक्स करा, नंतर हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि ते तसंच पंधरा मिनिटे राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास तुमची ही समस्या लवकर दूर होण्यास मदत होईल.

2. मेथी – जर तुमच्या टाळूला खाज सुटत असेल तर ती दूर करण्यासाठी मेथी खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला तुमच्या डोक्यातील खास दूर करायची असेल तर मेथीचे दाणे घ्या आणि त्यात एक चमचा मोहरी मिसळा. या दोन्हीची बारीक पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांवर लावा आणि ती सुमारे 30 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर तुमचे केस धुवून ते कोरडे करा त्यामुळे तुमच्या डोक्यातील खाज कमी होण्यास मदत होईल.

3. एरंडेल तेल – एरंडेल तेल हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. एरंडेल तेलाच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांची खास दूर करू शकता. यासाठी एक चमचा एरंडेल तेल घ्या त्यात एक चमचा मोहरीचे तेल आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करा. या मिश्रणाने तुमच्या केसांच्या मुळांना नीट मसाज करा आणि सकाळी तुमचे केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. यामुळे तुमच्या केसांमध्ये होणारी खाज दूर होईल.


पावसाळ्यामध्ये केस गळत असतील तर करा 'हे' घरगुती उपाय