बातम्या

डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Do this remedy for constant watery eyes


By nisha patil - 3/25/2024 7:29:03 AM
Share This News:



सतत मोबाईल किंवा कॉम्पुटरकडे पाहणे, हवेत फिरणे, झोप कमी होणे यामुळे अनेकांच्या डोळ्यातून सतत पाणी येते. त्यामुळे डोळ्यांना सारखं चोळल्यामुळे डोळा लाल होतो. त्यामुळे आपल्याला सारखं  त्या डोळ्याकडे लक्ष द्यावं लागत. डोळ्यातून येणाऱ्या या पाण्यासाठी आपण पाहू घरगुती उपाय करू शकता.
१) तुमच्या डोळ्यातून जर सतत पाणी येत असेल तर  कोमोमाईल किंवा पेपरमिंट चहाची काही पाने गरम पाण्यात टाकून ठेवावी. त्या पाण्याने डोळे शेकावेत.

२) डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ टाकून डोळे शेकावे. दिवसातून तीनवेळा असे केल्यास डोळंची खाज आणि जळजळ बंद होते.

३) आपल्या डोळ्यात जर काही घाण गेली तर डोळ्यातून पाणी येते. त्यासाठी रोज डोळ्यांच्या खाली आणि जवळच्या भागाला नारळाच्या तेलाने मालीश करावे.

४) हातामुळेही डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. डोळ्याची जळजळ, वेदना किंवा खाज येत असल्यास स्वच्छ पाण्यात कपडे भिजवून डोळे साफ करावेत. त्यामुळे कोणताही आजार होण्याचा धोका राहात नाही.

५)  स्वच्छ पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून ते गरम करावे. थोडे पाणी राहिल्यानंतर त्या पाण्याने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

६) थंड दूध- थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांच्या आसपास फिरवावा. कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून ठेवू शकतो. रोज हे उपाय केल्यास आराम पडतो.

७) कोरफड जेलमध्ये चमचा मध-अर्धा कप एल्डरबैरी चहा मिसळावा. दिवसातून दोनवेळा या मिश्रणाने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांचा त्रास काही वेळातच कमी होईल.


डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय