बातम्या
शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
By nisha patil - 3/20/2024 7:26:14 AM
Share This News:
सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढते. शरीराचं तापमान वाढलं की, आपल्याला घाम येऊ लागतो आणि काही वेळानंतर आपल्या संपूर्ण अंगाचा दुर्गंध वास येऊ लागतो. येणारी दुर्गंधी लपवण्यासाठी अनेकजण महागडे परफ्युम वापरतात.
परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती उपयुक्त उपाय सांगणार आहेत.– कडूलिंबु (Neem)
कडुलिंबात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून शरीरातून येणारी दुर्गंधी सहजपणे दूर केली जाऊ शकते. यासाठी एक कप पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे सुमारे दोन थेंब टाका. त्यात एक टॉवेल बुडवा आणि त्याद्वारेआपले बगल पुसून टाका.
– ऍपल व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवते. काखेतुन येणारा दुर्गंध दूर करण्याचे काम करते. यासाठी एक मग पाण्यात थोडेसे व्हिनेगर टाका आणि त्यानं तुमची ओरंपिट स्वच्छ करा.
– बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा देखील शरीरातून येणारा दुर्गंध दूर करण्याचा एक अतिशय उपयुक्त उपाय आहे.यासाठी तुमच्या अंडरआर्म्सवर बेकिंगसोडा लावा. बेकिंग सोडा घाम सहजपणे शोषून घेतो. जे वास येण्याचे मुख्य कारण आहे.
शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
|