बातम्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा हे काम

Do this to keep your heart healthy


By nisha patil - 6/7/2023 7:17:33 AM
Share This News:



काही लोक कामाच्या व्यस्ततेमुळे कुठे फिरायला जाऊ शकत नाहीत. त्यासोबतच एखादा प्लॅन केला तरी दहा कामं सांगत बसतात. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर वेळीच सावध व्हा. सुट्टी घेऊन कुठे फिरायला जाण्याचा नावाने कंटाळा करत असाल तर याकडे फार सिरिअस होऊन बघत नसाल तर आता तुमची ही सवय बदलण्याची वेळ आहे.

कारण एका रिसर्चमध्ये डॉक्टरांनी हॉलिडेला हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं सांगितलं आहे.

हा रिसर्च अमेरिकेतील Syracuse University कडून करण्यात आलाय. या शोधात वैज्ञानिकांनी निरोगी हृदयासाठी सुट्टी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. तर या रिसर्चचे सहायक प्राध्यापक ब्रायस ह्यूरस्का म्हणाले की, 'ज्या व्यक्तींनी गेल्या १२ महिन्या नेहमी सुट्टी घेतली, त्यांच्यात मेटाबॉलिज्म सिंड्रोम आणि याची लक्षणेही कमी आढळली'.

त्यांनी हे सांगितले की, मेटाबॉलिज्म सिंड्रोम हृदयरोगासाठी एक कारण आहे. जर कुणात ही समस्या अधिक असेल तर त्याला हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो. यासोबतच जे लोक नेहमी सुट्टीवर जातात. त्यांच्यात हृदयरोगाचा धोका कमी आढळला. याचं कारण म्हणजे मेटाबॉलिज्मसंबंधी लक्षणे परिवर्तनीय आहेत. याचा अर्थ ते बदलले किंवा नष्ट केले जाऊ शकतात.

मग कसला विचार करताय जर तुम्ही कधी सुट्टी घेऊन कुठे फिरायला जाण्याच्या प्लॅनच करत नसाल तर आता करा. आता हा प्लॅन फिरायला जाऊन आनंद मिळवण्यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा.


हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा हे काम