बातम्या

असे करा ताण-तणावाचे व्यवस्थापन

Do this to manage stress


By nisha patil - 11/16/2023 9:11:02 AM
Share This News:



वर्तनातील बदल:

1. झोपेत बदल : अति झोप लागणे, झोप न लागणे, शांत झोप न होणे.

2. चालढकल करत रहाणे: कुठल्याही कारणाने कामाच्या गोष्टींची चालढकल करत राहणे. काम पुर्ण करण्यात दिरंगाई करत रहाणे.


3. नखं खाणे: नखं खात/ कुरतडत रहाणे.

4. हलगर्जीपणा: कुठलेही काम करताना हलगर्जीणा करणे.

5. जंकफूड किंवा फास्टफुड खाण्याचे प्रमाण वाढणे : पटकन उपलब्ध होणारे आणि शरीराला पोषक नसलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढणे.

6. टाळाटाळ करणे : कुठल्याही गोष्टींची, कामाची टाळाटाळ करत राहणे. वेळेचे नियोजन न करता येणे. काम पूर्णत्वाकडे नेणे अवघड वाटत राहणे.

वरील लक्षणे आपल्या मध्ये किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती मध्ये जाणवल्यास आपण किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला कसला तरी ताण आहे हे लक्षात येते. काही वेळा काही शारीरिक वैद्यकीय कारणे ही असु शकतात परंतु वैद्यकीय ईलाज झाल्यावर पण लक्षणे दिसत असतील तर निश्‍चितच ताण आहे असे समजावे.

ताणाची कारणे बघुया :

1. कामाचा ताण: कामाच्या ठिकाणी अति काम असणे, वेळ कमी आणि काम जास्त अशा स्वरूपाचे काम असणे. नोकरीच्या ठिकाणी असणारी स्पर्धा, अनिश्‍चितता, सहकाऱ्यांसह बेबनाव – मतभिन्नता इत्यादी गोष्टीमुळे ताण निर्माण होतो.
2. आर्थिक समस्या: आर्थिक समस्या असणे, इन्कम कमी आणि खर्च जास्त असणे. अनपेक्षित खर्च वाढणे. आर्थिक नियोजन करण्यात अडचणी येणे.

3. कुटुंब व नातेसंबंधात समस्या असणे:
जोडीदारासोबत काही वाद विवाद असणे, नातेसंबंधात वाद असणे, वैवाहिक समस्या असणे, जोडीदाराकडून भावनिक आधार न मिळणे.
4. आरोग्य समस्या असणे: आरोग्विषयक काही समस्या असणे, आजारपण असणे, स्वतः च्या किंवा जवळच्या व्यक्तींबद्दल काही वैद्यकीय अडचणी असणे.

5. अचानकणे आलेले बदल: स्थलांतर, नोकरीत बदल, घटस्फोट, सेपरेशन, जवळच्या व्यक्ती चा मृत्यू, वातावरणातील बदल इत्यादी मुळे दैनंदिनी विस्कळीत होणे.

6. अभ्यासाचा ताण: परीक्षा, सतत बदलणारे परीक्षांचे स्वरूप, स्पर्धा, नोकरी करत असताना शिकत असतानाची धावपळ. वेळेचे नियोजन न करता येणे यामुळे ताण निर्माण होतो.
7. वातावरणातील घटक: नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण, आजूबाजूला कायम गोंगाट आवाज असणे, शांतता न मिळणे यामुळे ताण निर्माण होतो.

8.सामाजिक दबाव: सामाजिक दबाव असणे, आपल्या परिवाराकडून आपल्या विषयी असणाऱ्या अपेक्षांचा दबाव असणे, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी टिकून राहण्याच्या स्पर्धेचा दबाव असणे, सामाजिक भेदभाव असणे यामुळे ताण निर्माण होतो.
9.भूतकाळातील घटना वा आघात: आयुष्यात घडून गेलेल्या नकारात्मक घटनांमुळे मनावर आघात झालेले असणे, यामुळे ताण निर्माण होतो.

10.जबाबदाऱ्या अति असणे: एका वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागत असणे. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असाव्या लागत असणे यामुळे ताण निर्माण होतो.
11.जीवनशैली: व्यायामाचा अभाव, अति व्यस्त जीवनशैली, व्यसन असणे, पौष्टिक सकस अन्न न खाणे, कुठल्याही गोष्टीत सातत्य, नियोजन नसणे यामुळे ताण निर्माण होतो.

12.अनिश्‍चितता: आपल्या भविष्याबाबत, कुटुंबाबद्दल चिंता वाटत राहणे, अनिश्‍चीतता वाटत राहणे, यामुळे ताण निर्माण होतो. तर वरील सर्व कारणांमुळे ताण निर्माण होऊ शकतो. ताण निर्माण होणे हे नैसर्गिक आहे हे आधी लक्षात घेतले पाहिजे.

अति ताण हा मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम करतो. ताणाचे वेळीच नियोजन केले नाही, तर त्याचा आपली नोकरी, व्यवसाय, व्यक्तिमत्त्व, क्षमता अशा सर्वच घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे वेळीच ताणाची कारणे ओळखून ताणाचे नियोजन करणे खूप गरजेचे असते.


असे करा ताण-तणावाचे व्यवस्थापन