बातम्या

सतत थकल्यासारखं जाणवतं का? लगेच खाणं बंद करा या गोष्टी

Do you feel tired all the time


By nisha patil - 9/17/2023 7:42:57 AM
Share This News:



असे बरेच लोक असतात ज्यांना सतत थकवा जाणवत असतो. याने आरोग्यासोबतच तुमच्या कामावरही फार वाईट परिणाम पडतो. या समस्येमागे बरीच कारणे असू शकतात जसे की, थकवा, स्ट्रेस, मेडिकल कंडीशन आणि लाइफस्टाईल.

अनेकदा काही गोष्टींचं सेवन केल्यानेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. चला जाणून घेऊ त्यांबाबत....

प्रोसेस्ड और फास्ट फूड - प्रोसेस्ड आणि फास्ट फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि एडेड शुगरचं प्रमाण जास्त असतं. असे पदार्थ खाल्ल्याने शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि अचानक कमी सुद्धा होते. ज्यामुळे तुमची एनर्जी लगेच कमी होते, याच कारणाने तुम्हाला थकवाही जाणवतो.

हाय शुगर फूड - हाय शुगर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने शरीरात काही वेळासाठी एनर्जी वाढते आणि लगेच कमी होते. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि मग तेवढ्याच वेगाने कमीही होते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

हाय फॅट असलेले फूड - फॅट आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं मानलं जातं. पण जास्त प्रमणात हाय फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने तुम्हाला झोप येते आणि थकवाही जाणवतो. हाय फॅटयुक्त पदार्थ डायजेस्ट करण्यासाठीही जास्त वेळ लागतो. ते पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे जास्त थकवा जाणवतो.

रिफाइंड धान्य - रिफाइंड धान्य जसे की, पांढरे तांदूळ, पास्ता, व्हाइट ब्रेड इत्यादींमध्ये पोषक तत्व, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण फार कमी असतं. हे खाल्ल्याने तुमची शुगर लेव्हल वेगाने वाढते आणि तेवढ्याच वेगाने कमी होते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

एनर्जी ड्रिंक्स - एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफीनचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला काही वेळासाठी एनर्जी मिळते. सोबतच याचं सेवन केल्याने तुमचा स्लीप पॅटर्नही डिस्टर्ब होतो. याच कारणाने तुम्हाला सतत थकव्याचा सामना करावा लागू शकतो.


सतत थकल्यासारखं जाणवतं का? लगेच खाणं बंद करा या गोष्टी