बातम्या
थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा
By nisha patil - 3/29/2024 7:27:24 AM
Share This News:
खजूर खाण्याबद्दल अनेकांचा असा गैरसमज असतो की ते शरीराला फार गरम पाडतात. अनेकांना असं वाटतं की खजूर शरीराला गरम पडतात. आयुर्वेदानुसार खजूर खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. पित्त विकार दूर करण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतात. खजूरात फायबर्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटामीन, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. खजूरात व्हिटामीन सी, व्हिटामीन डी यांसारखी पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार खजूरात एंटी ऑक्सिडेंट्स कॅरोटीनॉईड्स आणि फिनोलिक्स असतात. याव्यतिरिक्त खजूरात पोटॅशियम आणि फॉस्फरेस, मॅग्नेशियम यासांरखी पोषक तत्व असतात.(Ref) नियमित खजूर खाल्ल्यानं गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार खजरू खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. खजूर नेहमीच भिजवून खायला हवेत.
खजूर खाण्याचे फायदे...
खजूर खाल्ल्याने गॅस, एसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, हाडं मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, पुरूष आणि महिलां दोघांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते, मेंदूचे आरोग्य चांगले राहते. शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही, वजन नियंत्रणात राहते, सूज कमी होते, त्वचा आणि केस चांगले राहतात.
खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती...?
सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाता येतात, नाश्त्याच्या वेळेस तुम्ही खजूर खाऊ शकता, दिवसभरात कधीही गोड खाण्याची इच्छा झाल्यास खजूर खा, रात्री झोपण्याच्या आधी खजूर खाऊ शकता.
एका दिवसाला किती खजूर खायचे...?
रोज २ खजूर खाऊन तुम्ही दिवसाची सुरूवात करू शकता. वजन वाढू नये यासाठी रोज ४ खजूर खा.
खजूर भिजवून का खावेत...?
भिजवलेल्या खजूरात टॅनिन, फायटिक एसिड असत, त्यातील पोषक तत्व पोषण देतात. खजूर पचायला चांगले असतात. म्हणून खजूरातून जास्तीत जास्त पोषण मिळते. रात्री झोपताना भिजवून टेवा. खजूर भिजवल्याने त्याली टॅनिक आणि फायटीक एसिड निघून जाते. खजूर भिजवल्याने पचनक्रिया चांगली राहते, याशिवाय शरीराला भरपूर पोषण मिळते.
लहान मुलांसाठी खजूर कसे फायदेशीर ठरते...?
खजूर मुलांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हिमोग्लोबिनची कमतरता आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याासाठी रोज खजूर खाणं फायदेशीर ठरतं.
थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा
|