बातम्या

निरोगी जीवनाचे गुपित माहित आहे का? डाळिंब, आवळा आणि संतुलित आहार

Do you know the secret to a healthy life


By nisha patil - 9/3/2024 7:29:51 AM
Share This News:



 बदललेली जीवनशैली, स्पर्धा, कामाचा वाढता ताण, सततची धावपळ यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ मिळत नाही. यामुळेच विविध प्रकारचे आजार बळावतात. केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. हे आजार दूर ठेवायचे असल्यास आयुर्वेदात सांगितलेले अगदी सोपे उपाय केल्यास खूप फायदा होऊ शकतो. निरोगी जीवन जगण्याचा आनंद यातून मिळू शकतो.

दररोजच्या धावपळीतही आपले आरोग्य टीकविण्यासाठी काही उपचार आहेत. त्यापैकी काही प्रमुख उपाय आपण येथे जाणून घेणार आहोत. यापैकीच एक आहे आवळा. आवळ्याचा रस, गायीचे तूप, मध व मिश्री प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करावे. सकाळी उपाशी पोटी या मिश्रणाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासांपर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांना आपण दूर ठेवू शकतो. हा उपाय तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.

डाळिंबदेखील आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही. तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकून राहते. डाळिंबाचे सेवन रक्ताशी संबंधित अनेक आजारांपासून शरीराला वाचवते तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच निरोगी जीवनासाठी संतुलित आहार खूपच महत्वाचा ठरतो. यासाठी दररोज संतुलित आहार घेतला पाहिजे. आहार पचण्यास हलका असावा. शरीराच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होणार नाहीत असा आहार घ्यावा. खाण्यात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्त्वांचे जास्तीत जास्त प्रमाण असावे. बाहेरचे खाद्य, तेल, तूप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.


निरोगी जीवनाचे गुपित माहित आहे का? डाळिंब, आवळा आणि संतुलित आहार