बातम्या

अंड्याच्या कवचाचे ‘हे’ १० फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

Do you know these 10 benefits of egg shell


By nisha patil - 6/3/2024 7:30:56 AM
Share This News:



अंड्याचे कवच हे कॅल्शिअमचा मोठा स्त्रोत आहे. कवचांना गरम पाण्याने धुवून उन्हामध्ये सुकवून त्यांची बारिक पावडर करून ती एअर टाईट डब्यामध्ये ठेवली जाते. याचा वापर कॅल्शिअम पावडर म्हणून करता येतो. अंड्याच्या कवचाचे आणखी कोणते उपयोग आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत उपयोग
१ कवच टाकून देण्याऐवजी घरात लावल्यास पाली पळून जातात.

२ याची पावडर तयार करून ती कॅल्शिअम पावडर म्हणून वापरू शकता.३ घरातील किटकांना पळवून लावण्यासाठीही उपयोग होतो.

४ कपड्यांची चमक वाढते. एका बादलीमध्ये दोन चमचे अंड्याच्या कवचांची पावडर टाकून त्यामध्ये रात्रभर कपडे भिजवा. दुसऱ्या दिवशी कपडे धुतल्यानंतर चमक जाणवेल.

५ भाज्या आणि फळांजवळ नेहमी किडे येतात. त्यासाठी तुम्ही अंड्याची कवचे तोडून भाज्या आणि फळांच्या आसपास ठेवा.

६ मेणबत्ती म्हणून तुम्ही अंड्याच्या कवचाचा वापर करू शकता.

७ मांजर येत असेल त्याठिकाणी काही अंड्याची कवचे तोडून टाकावीत. मांजर पळून जाईल.

८ अंड्याच्या कवचाची पावडर अंड्यामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा तजेलदार होते.

९ त्वचेला जळजळ किंवा खाज येत असेल तर त्यासाठीही अंड्याची कवचं फायदेशीर ठरतात.

१० घरातील खरकटी भांडी साफ करण्यासाठी साबणाच्या पाण्यामध्ये अंड्याच्या कवचांची पावडर मिक्स करावी


अंड्याच्या कवचाचे ‘हे’ १० फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?