बातम्या
चंदनाचे ‘हे’ ९ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
By nisha patil - 6/3/2024 7:35:12 AM
Share This News:
पूजाविधीमध्ये चंदनला खूप महत्व आहे. अनेक कार्यात त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चंदनाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१. कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून लावावे. दाह कमी होतो.
२. चंदन पावडर पाण्यात मिश्रित करून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.
३. शरिराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
४. तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.
५. चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.
६. त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी चंदन अत्यंत गुणकारी आहे.
७. चेहऱ्यावर मुरुमे जास्त असल्यास गुलाबपाण्यात चंदन मिश्रित करून लेप लावा.
८. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.
. शरिरातील स्नायू दूखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करावी
चंदनाचे ‘हे’ ९ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
|