बातम्या
हळदीचे दूध पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?
By nisha patil - 2/7/2023 7:27:19 AM
Share This News:
दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, त्यामुळे दूध पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. सर्दी-खोकला झाल्यास अथवा डोके दुखल्यास हळदीचे दूध आवर्जून पिले जाते.तुम्हाला थकवा जाणवत, असेल अथवा अशक्तपणा आला असेल तर, अशा वेळी हळदीचे दूध पिल्याने चांगला फायदा होतो.
चला तर मग जाणून घेऊयात हळदीच्या दूधाचे फायदे…
1.तुमच्या हाडांना त्रास होत असेल तर अशावेळी हळदीचे दूध पिल्याने आराम मिळेल. एक ग्लास दूधामध्ये दोन चमचे हळद टाकून रोज रात्री हे दूध पिल्याने अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत मिळेल.
2.हळदीचे दूध पिल्याने तुमच्या शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. याचबरोबर तुमची पचनक्षमता चांगली राहते.
3. तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर हळदीचे दूध जरूर प्या, त्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
4. त्वचेसाठी हळदीचे दूध अतिशय लाभदायी ठरते. हे दूध पिल्याने तुमची कांती उजळते. हळदीमध्ये अॅंटिऑक्सिडन्ट गुण असल्याने त्वचेशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत मिळते.
5. हळदीचे दूध पिल्याने शरिरात जमा झालेले फॅट्स कमी होतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हळदीचे दूध पिणे अतिशय फायदेशीर आहे.
हळदीचे दूध पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?
|