बातम्या

फ्लॉवर आवडीनं खाता?

Do you like to eat flowers


By nisha patil - 12/28/2023 7:38:58 AM
Share This News:



 फ्लॉवर ही एक अशी भाजी आहे जी अनेकांची आवडती आहे. या भाजीपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यात येतात. त्यात सगळ्यांना आवडणारे कटलेट्स किंवा पकोडे तर अनेकांच्या तोंडाला पाणी आणतं.

त्यातही हिवाळा सुरु झाला की खूप फ्रेश आणि चांगला फ्लॉवर येतो असं आपल्याला आई अनेकदा सांगताना दिसते. आता जर तुम्ही बाजारा गेलात तर तुम्हाला ही भाजी सगळीकडे पाहायला मिळेल. फ्लॉवरमध्ये अनेक गुणधर्म असतात म्हणून जरी कोणाला आवडत नसेल तरी आपली आई किंवा घरातील मोठे आपल्याला आवर्जून ही भाजी खाण्यास सांगतात. पण तुम्हाला माहितीये का? ज्या लोकांना एक स्पेसिफीक आजार आहेत त्यांनी फ्लॉवर खाऊ नये किंवा जर खूप आवडत असेल तर हळूहळू कमी करावा.

फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि लोह भरपूर प्रमाणात असते. यासोबतच व्हिटॅमिन ए, बी, सी आणि पोटॅशियम देखील असतात. आता सगळ्यांसमोर उपस्थित असलेला प्रश्न म्हणजे कोणत्या लोकांनी फ्लॉवरचे सेवन करणे टाळायला हवे, कारण जर या लोकांनी खाल्लं तर त्यांच्या आरोग्यावर या सगळ्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोणी करु नये फ्लॉवरचे सेवन

किडनी स्टोनची समस्या असल्यांनी फ्लॉवर टाळआ
ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी फ्लॉवरचे सेवन टाळावे. कारण लिव्हर आणि किडनीशी संबंधीत समस्या असतील तर फ्लॉवरचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अॅसिडीडीचा त्रास असलेल्यांनी फ्लॉवर खाऊ नये
ज्या लोकांना गॅस किंवा अॅसिडीडी समस्या आहे, त्यांनी फ्लॉवरचे सेवन टाळावे. ते सहज पचण्याजोगे नसते. त्याचा प्रभाव थंड असतो, तो वायूचा कारक असतो, त्यामुळे पचायला जड असतो.

थायरॉईडच्या रुग्णांनी खाऊ नये
जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर फ्लॉवरचे सेवन टाळा. कारण फ्लॉवरचे सेवन केल्याने तुमचे T3 आणि T4 हार्मोन्स वाढू शकतात.

ऍलर्जीच्या समस्या वाढू शकतात
ज्यांना ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी फ्लॉवरचे सेवन टाळावे.

रक्त घट्ट होईल

फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असते. त्यामुळे जे लोक फ्लॉवरचे जास्त सेवन करतात त्यांचं रक्त हळूहळू घट्ट होऊ लागतं. ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेला त्यातील अनेक लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधांचं सेवन करतात. अशात त्यांनी फ्लॉवरचे सेवन करणं धोकादायक ठरू शकतं.


फ्लॉवर आवडीनं खाता?