बातम्या

आवळा खाल्ल्यावर खरंच पांढरे केस होतात का काळे? जाणून घ्या!

Do you really get white hair after eating Amla


By nisha patil - 11/13/2023 9:48:21 AM
Share This News:



पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. पण तुम्हाला माहितीये का की आवळा हा तुमच्या केसांसाठी प्रभावी ठरतो. आवळ्यामध्ये काही असे गुणधर्म आहेत जे तुमचे केस काळे करण्यास उपयोगी पडतात.

आवळा हा आपल्या केसांसाठी फायदेशीर मानला जातो. कारण आवळ्यामध्ये तांबे असते जे मेलेनिन रंगद्रव्य वाढवण्यास मदत करते. हे मेलेनिन तुमचे केस काळे करण्यास मदत करते. तसेच आवळ्यामध्ये झिंक असते व्हिटॅमिन सी असते जे आपले केस दाट आणि काळे बनवते. सोबतच केसांच्या इतर समस्यांपासून देखील सुटका मिळते. आवळ्यामुळे कोंडा दूर होतो, रक्ताभिसरण वाढते.

केसांसाठी तुम्ही दोन प्रकारे आवळ्याचा वापर करू शकता. त्यात पहिलं म्हणजे तुम्ही आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता, आवळा सुपारी, कँडी खाऊ शकता. तर दुसरं म्हणजे आवळ्याचं पाणी तुम्ही तुमच्या केसांना लावा. यामुळे तुमचे केस निरोगी राहण्यास मदत होते. तसंच पांढरे केस काळे होण्यास मदत होते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणं आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरते.

आवळा हा अनेक प्रकारे आपल्या केसांसाठी गुणकारी ठरतो. आवळ्यामुळे आपले केस मजबूत, सॉफ्ट, रेशमी होण्यास मदत होते. भरपूर लोकांचे केस पातळ असतात, गळत असतात. ही समस्या देखील आवळ्यामुळे नाहीशी होते. आवळ्यामुळे आपला टाळू निरोगी राहतो आणि आवळा रक्ताभिसरण गतिमान करते. त्यामुळे केसाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. त्यामुळे आवळ्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे


आवळा खाल्ल्यावर खरंच पांढरे केस होतात का काळे? जाणून घ्या!