बातम्या

डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Doctors Champion Trophy Tennis Ball Cricket Tournament begins


By nisha patil - 10/27/2023 10:48:38 PM
Share This News:



 शास्त्रीनगर मैदानावर डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभाग घेतला आहे. रॉयल आष्टा आणि यंगस्टर या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून पुढील फेरी गाठली.

या स्पर्धेत  रॉयल आष्टा, केपीजी, सह्याद्री वॉरिअर, यंगस्टार इचलकरंजी, स्कॉरपीअन, कोल्हापूर किंग्ज, एस आर टी, अश्वमेध वडगांव असे आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.  डॉ.समीर कोतवाल आणि डॉ, शेखर पोहाळकर यांनी या स्पर्धेचे  आयोजन केले आहे. 
. डॉ, विजय गावडे, डॉ, रुपाली पाटील, डॉ, अशिष नलवडे, प्राचार्य डॉ, महादेव नरके, डॉ, प्रमोद नागुरे, डॉ, राजेश सातपुते, डॉ शीतल पाटील, डॉ, हर्षवर्धन जगताप, डॉ, अभिजित कोराणे, डॉ, समीर कोतवाल यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.

 स्पर्धेतील पहिला सामना केपीजी विरुध्द रॉयल आष्टा यांच्यात खेळला गेला, प्रथम फलंदाजी करत केपीजी संघानं ८ षटकात ५ बाद ६५ धावा फटकावल्या. प्रतिउत्तरादाखल खेळतांना रॉयल अष्टा संघानं ७ षटकात २ बाद ६६ धावा फटकावून विजय मिळवत पुढील फेरीत गाठली, केपीजी संघाच्या विशाल जाधव यानं सर्वाधीक २९ तर रॉयल अष्टा संघाच्या . ज्योतिराज मस्के – पाटील यांनी सर्वाधिक ३२ धावा केल्या. दुसरा सामना यंगस्टर विरुध्द सह्यद्री वॉरीअर यांच्यात खेळला गेला. यंगस्टार संघानं प्रथम फलंदाजी करत ८ षटकात ५ बाद ९१ धावा केल्या. तर प्रतिउत्तरादाखल खेळतांना सह्याद्री वॉरीअरसचा खेळ ८ षटकात ७ बाद ४७ धावात गुंडाळला. यंगस्टारच्या शुभम गणगुडेनं ३४ आणि विवेक बन्ने यानं २८ धावा केल्या, तर सह्याद्री वॉरीअरसचा खेळाडू युवराज मंगसुळे यांनी संघासाठी २२ धावांची खेळी केली.


डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ