बातम्या

आंबट-थंड पदार्थांचं सेवन केल्यानं सांधेदुखीचा त्रास होतो का ? , जाणून घ्या

Does consumption of sour


By nisha patil - 2/14/2024 7:45:59 AM
Share This News:



डोकेदुखी आणि ताणतणाव जाणवत आहे?  
उत्तर_नियमित ध्यान, योग – प्राणायाम करावे तसेच दिनक्रम योग्य ठेवावा. आपण असा विचार करा की कोरोनाचा त्रास जास्त दिवस नाही. कमी मसालेदार(sour) पदार्थ खा. भरपूर झोप घेतली पाहिजे. सकाळी आणि सायंकाळी गाईचे तूप नाकात सोडा. कोणतेही मद्य सेवन करू नये. रात्री एक चमचा दुधात अश्वगंधा पावडर घ्या.

प्रश्नः कायम सांधेदुखीचा त्रास आहे त्यावर काही उपाय सुचवा?
उत्तरः मोठे खडे असलेले मीठ गरम करून ते एका पिशवीत भरावे. त्या पिशवीने सकाळ आणि सांयकाळी शेकावे. आहारात थंड आणि आंबट गोष्टी टाळाव्यात. तसेच आहारात सुंठ, काळी मिरी, हळद आणि कोरफड सेवन करावे. जिरे आणि ओवा पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. सांध्यातील दुखण्याने सूज येत असल्यास नारळ तेलात सुंठ पावडर टाकून लेप तयार करा.

प्रश्नः लॉकडाऊनमध्ये साखरेची पातळी वाढली आहे. त्यासाठी काय करावे?
उत्तर _२-३ चमचे मेथीचे दाणे अर्धा लिटर पाण्यात रात्रभर भिजवून घ्या. सकाळी मेथीच्या दाण्याचे चांगले मिश्रण करून त्याचे पाणी प्यावे. कारले वाळवून त्याची पावडर तयार करा. जेवणआधी अर्धा तास एक चमचा कारले पावडर घ्या. यामुळेही साखर पातळीवर नियंत्रण ठेवले जाईल. आपल्याला जांभूळ बियाणे मिळाली तर ते अधिक चांगले होईल. त्रिफळा आणि हळद घेणे देखील उपयुक्त ठरेल.  झोपेच्या आधी २-३ चमचे त्रिफळा पावडर घ्या. हरभरा पावडर, मैदा, दही, रवा आणि मीठ कमी प्रमाणात खावे.


प्रश्न: सकाळी उठून शिंका येतात सर्दीही असते?
उत्तर_ थंड पदार्थ टाळावे. गरम पदार्थ अधिक खावे. दिवसातून २-३ वेळा गरम पाण्यात हळद टाकून त्याची वाफ घ्या. आंबट, गोड आणि तेलकट गोष्टी टाळाव्यात. एक लिटर पाण्यात अर्धा चमचा हळद, एक लहान हिरडा आणि एक चमचा ओवा उकळून ते पाणी प्यावे


आंबट-थंड पदार्थांचं सेवन केल्यानं सांधेदुखीचा त्रास होतो का ? , जाणून घ्या