बातम्या
डॉल्बी लावणाऱ्यावर सक्त कारवाई करणार
By nisha patil - 9/9/2023 7:48:05 PM
Share This News:
१९ सप्टेंबर पासून राज्यासह जिल्ह्यात गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शासनाच्या नियमाचे पालन करून,गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. पन्हाळा इथे झालेल्या तरुण मंडळाच्या बैठकीत शाहूवाडी विभागाचे डीवायएसपी, जयकुमार सूर्यवंशी, यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी डीजे ला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवावे, सर्व मंडळांनी धर्मादाय आयुक्त ग्रामपंचायत पोलिस विभाग यांच्या परवानगी घ्याव्यात. जे मंडळे डॉल्बी साठी आग्रह करून डॉल्बीचा वापर करतील अशा मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येईल . फ्लेक्स, बॅनर, डिजिटल बोर्ड, लावताना ही रीतसर परवानगी घ्यावी. सोशल मीडियावरील कोणताही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गणेश उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी सर्व मंडळांना केले
या बैठकीला पन्हाळाचे तहसीलदार माधवी शिंदे , पन्हाळा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड , माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, ज्येष्ठ नागरिक सुभाष गवळी, माझी पोलीस पाटील भीमराव काशीद, पन्हाळा भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले, यांच्यासह तालुक्यातील गणेश मंडळ चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
डॉल्बी लावणाऱ्यावर सक्त कारवाई करणार
|