बातम्या
पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने घरगुती ,सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव स्पर्धा.
By nisha patil - 9/13/2024 12:24:41 AM
Share This News:
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद पन्हाळा पर्यावरण पूरक घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव गणेशोत्सव स्पर्धा २०२४ करिता नगरपरिषदेकडून सर्व घरगुती गणपती व सार्वजनिक गणपती यांचे परीक्षण केले आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक गणपती बक्षीस वितरण २ ऑक्टोंबर रोजी होईल. असे नगरपरिषदेची अधीक्षक अमित माने यांनी आपल्या दैनिकाला माहिती दिली. सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव स्पर्धा करिता खालील प्रमाणे बक्षीस आहेत.
प्रथम क्रमांक,रू.१००००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक, रू.७०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र,तृतिय क्रमांक, रु.५०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र. पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा करिता प्रथम क्रमांक,रू.५०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र,व्दितीय क्रमांक रु.३०००/- सन्मानचिन्हवप्रमाणपत्र,तृतिय,क्रमांक रू.२०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पन्हाळा शहरातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आयोजित करणेत आली आहे. ही स्पर्धा २०१९ पासून सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी घरगुती गणपती मध्ये असे क्रमांक. आले होते.प्रथम - तनुजा सुभाष गवळी, द्वितीय- आशिकी चेतन राऊत तृतीय - यश बाळासाहेब भोसले तर सार्वजनिक मंडळामध्ये प्रथम,बालाजी क्रीडा मंडळ. द्वितीय, श्री दत्त तरुण मंडळ. तृतीय धर्मवीर क्रीडा मंडळ यावर्षी स्थानिक बारा मंडळा नी यात सहभाग घेतलाय आहे.परीक्षण करण्यासाठी नगरपरिषद चे कर्मचारी,सुहास भोसले, नंदूकुमार कांबळे, नरेंद्र कांबळे, मुकुल चव्हाण, शंतनु सुतार,इत्यादी होते.
पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने घरगुती ,सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव स्पर्धा.
|