बातम्या

इचलकरंजीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; एक महिला गंभीर जखमी

Domestic gas cylinder explosion in Ichalkaranjit


By nisha patil - 12/22/2023 1:56:56 PM
Share This News:



इचलकरंजीत घरगुती गॅस सिलेंडरचा  स्फोट; एक महिला गंभीर जखमी

इचलकरंजी : इचलकरंजी येथील विक्रम नगर परिसरातील घरगुती गॅस सिलेंडर मधून गळती होऊन मोठा स्फोट झाला. यामध्ये सुरेखा सुभाष वाघमोडे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. स्फोटात राहत्या घराची भिंत, दरवाजे उध्वस्त होऊन प्रापंचिक साहित्याचे मोठं नुकसान झाले आहे, तर आजूबाजूच्या दोन घरांचे ही नुकसान झाले आहे. आरगे मळा परिसरात झालेल्या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.
 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरगे मळा भागात वाघमोडे कुटुंबीय कुटुंबासह राहतात. त्यांची दोन मजली इमारत आहे पहिल्या मजल्यावरील वाघमोडे कुटुंबीयांनी रात्री झोपताना घराची सर्व दरवाजा खिडक्या बंद केल्या होत्या गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उठल्यानंतर  सुरेखा वाघमोडे यांनी लाईटचे बटन सुरू केले मात्र त्या ठिकाणी क्षणार्धात स्पार्क होऊन मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने वाघमोडे यांच्या घराच्या पुढील बाजूच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. वाघमोडे यांच्या घराची भिंत उध्वस्त झाली. भिंत घराच्या दोन्ही दरवाजाच्या चौकटीवर पडून दरवाजे दूरवर फेकले गेले सकाळी सकाळी स्फोटाच्या आवाजाने आरगे मळा, इंदिरा नगर, परिसरातील नागरिक भयभयीत झाले होते. जखमी सुरेखा वाघमोडे यांच्यावर सांगली सिविल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भागातील नागरिकांनी  आगीवर नियंत्रण आणून वाघमोडे कुटुंबियांची सुटका केली.
 

 घटनास्थळी गॅस कंपनीचे कर्मचारी दाखल झाले असता शूट गॅस गळतीमुळे झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सिलेंडर मधून झालेली गॅस वरती व विजेचा करंट याच्या संपर्कामुळे स्पोर्ट होऊन आगीचा भडका उडाला आहे असल्याची माहिती समोर येत आहे.


इचलकरंजीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; एक महिला गंभीर जखमी