बातम्या
कदमवाडी - कपूर कॉलनीतील घरगुती गँसला गळती
By nisha patil - 9/2/2024 12:40:26 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : डी.वाय.पाटील हॉस्पिटल कदमवाडी, कपूर वसाहत येथे सुभाष बाळकृष्ण जोंधळे यांच्या घरामध्ये गॅस लिकेज होऊन घरात आग लागली. यात सुमारे 25 ते 30 हजाराचे नुकसान झाले. आगीमध्ये प्रापंचिक साहित्य, इलेक्ट्रीक साहित्य, वायरिंग आधीचे नुकसान झाले आहे. तसेच यात सुभाष बाळकृष्ण जोंधळे हे जखमी झाल्याने सध्या उपचार घेत आहेत.
परिसरात भितीचे वातावरण पसरले.
याचा अधिक तपास फायर स्टेशन चे अधिकारी सुभाष ढेपले व पदाधिकारी करत आहेत.फारयस्टेशन चे कर्मचारी संजय यादव यांनी आग आटोक्यात आणल्याने लोकांना धिर आला.या धाडसाबदल यादव यांचे कौतुक केलं जातं आहे.
कदमवाडी - कपूर कॉलनीतील घरगुती गँसला गळती
|