बातम्या
परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका...
By neeta - 1/27/2024 1:20:16 PM
Share This News:
कोल्हापूर : मराठा समाजाचा गेले पाच महिन्यापासून लढत असलेला लढा अखेर पूर्ण झाला. शासनाने शासकीय अध्यादेश काढत मराठ्यांच्या सरसकट मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी चौकात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदउत्सव साजरा करण्यात आला.
सकल मराठा समाजाचे अध्यक्ष वसंत मुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, मनोज जरांगेची भूमिका तीच मराठ्यांची भूमिका या भावनेने लाखो मराठा बांधव या आरक्षणाला सामील झाले होते. राज्य सरकारने अध्यादेश काठत मराठा समाजातील सर्वांना कुणबी नोंदी देण्याचं मान्य केलं आहे. आता जो अध्यादेश काढला आहे त्यात राज्य सरकारने कोणताही खोट आणता कामा नये. आज आम्हाला पूर्ण यश मिळाले असे नाही आहे. ज्यांच्या नोंदी मराठा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणारं नाही परंतु त्यांच्यासाठी राज्य सरकारने ओबीसीच्या सवलती देण्याच्या मान्य केल्या आहेत हे आमच्यासाठी जमेची बाजू आहे. असे ते म्हणाले.
तसेच आता राहता राहिला प्रश्न सरसकट मराठा आरक्षणाचा! तो प्रश्न मात्र सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे यासाठी राज्य सरकारने सरसकट मराठा आरक्षण द्यावे.जो राज्यसरकारने अध्यादेश काढला आहे त्याचा अभ्यास मराठा समाज करत आहे.ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा . नाहीतर परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका.असे सकल मराठा अध्यक्ष वसंत मुळे म्हणाले
मनोज जरागेंच्या कडक इशारानंतर रात्रीत काठले अध्यादेश
आज रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबतीत आदेश काढावा. अन्यथा, 27 जानेवारी दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश मध्यरात्री काढल्यानंतर आझाद मैदानाकडील प्रवास थांबवला आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका...
|