बातम्या
दोन हजारांच्या नोटांचे साईंच्या चरणी अडीच कोटींचे दान
By nisha patil - 6/24/2023 9:17:23 AM
Share This News:
दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर या नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. सदरच्या निर्णयानंतर साईबाबांच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटांचे दान वाढले आहे. एरवी चलनात न दिसणाऱ्या दोन हजारांच्या नोटा साईंच्या झोळीत पडल्या असून, अवघ्या महिनाभरात तब्बल दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात अडीच कोटींचे दान साईबाबा संस्थानला प्राप्त झाले आहे.
मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेत 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर साईंच्या दानात तुरळक आढळणाऱ्या दोन हजारांच्या नोटांमध्ये गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली आहे. महिन्यात दान स्वरूपात दोन हजारांच्या एकूण 12 हजार नोटा प्राप्त झाल्या आहेत अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांनी दिली.
दोन हजारांच्या नोटांचे साईंच्या चरणी अडीच कोटींचे दान
|