विशेष बातम्या

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना करू नये 'या' चुका!

Dont do these mistakes when keeping food in the fridge


By nisha patil - 6/20/2023 7:20:45 AM
Share This News:



फ्रिज हा आपल्या घराचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उपयोग अन्न ताजे ठेवण्यासाठी, बर्फ तयार करण्यासाठी आणि थंड पाणी ठेवण्यासाठी केला जातो. रेफ्रिजरेटर स्वच्छ करून त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहित असले पाहिजे, अन्यथा आपण त्याचा योग्य फायदा घेऊ शकणार नाही.

अनेकदा आपल्या लक्षात आले आहे की, बराच वेळ फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यानंतर जेव्हा आपण अन्न खाऊन बघतो तेव्हा त्याची चव बदलू लागते. अनेकदा अन्न खराब होते मग कधी कधी आपल्याला अन्न फेकून द्यावे लागते. यात बरीचशी चूक आपलीच असते. आपण फ्रीजमध्ये अन्न ठेवताना चुका करत असतो. चला तर मग जाणून घेऊया फ्रिजमध्ये वस्तू ठेवताना आपण कोणत्या चुका करू नयेत.

फ्रीजमधील अन्नात किडे, कोळी किंवा माश्या पडतील, असे आपल्याला अनेकदा वाटते. आपण अन्न झाकून न ठेवता फ्रीजमध्ये ठेवतो, तर कधी आळशीपणामुळे असं करतो. पण हा योग्य मार्ग नाही, थंडीमुळे अन्नावर एक थर तयार होऊ लागतो म्हणून फ्रिजमध्ये अन्न झाकून ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय तापमान कमी असल्याने अन्नाची चव बिघडते.

एखाद्या ओल्या भांड्यात अन्न टाकून फ्रिजमध्ये ठेवले अन्न खराब होतं. भांड्यात पाणी किंवा त्याचे थेंब राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, कारण ओलेपणामुळे अन्नाची चव खराब होते. विशेषत: हिरव्या भाज्या खाण्या योग्य नसतात. त्यामुळे अशी चूक केली नाही तर बरे.

फ्रिजचे काम आपले अन्न ताजे ठेवणे आहे. परंतु जर आपण त्याचा डस्टबिन म्हणून वापर करण्यास सुरवात केली तर नुकसान होणारच आहे. बरेच लोक रेफ्रिजरेटर मध्ये खचाखच खाद्यपदार्थ भरतात, जेणेकरून अन्नाची चव एकमेकांमध्ये हलकीशी मिसळते.


फ्रीजमध्ये अन्न ठेवताना करू नये 'या' चुका!