विशेष बातम्या
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका - शिक्षण संचालक शरद गोसावी
By nisha patil - 5/2/2025 7:24:37 PM
Share This News:
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका - शिक्षण संचालक शरद गोसावी
कोल्हापूर, दि. 5: आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. या प्रक्रियेत लॉटरी पद्धतीने प्रवेश पात्र लाभार्थ्यांची यादी शाळानिहाय जाहीर केली जाते, ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. पालकांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जात असल्यास, अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले.
गैरप्रकार आढळल्यास संबंधित विभागाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे ई-मेल किंवा समक्ष तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारच्या गैरप्रकारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका - शिक्षण संचालक शरद गोसावी
|