बातम्या
परीक्षा नको आता सरसकट फेलोशीप द्या, संतप्त विद्यार्थ्यांची मागणी
By nisha patil - 12/1/2024 2:42:32 PM
Share This News:
कोल्हापूर : सारथी बार्टी महाज्योती स्वायत्त संस्थामधील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या फेलोशिप चाळणी परीक्षेत पुन्हा दुसऱ्यांदा गोंधळ झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेला संशोधक विद्यार्थ्यांनी परीक्षा नको सरसकट स्कॉलरशिप द्या अशी मागणी लावून धरली आहे. सारथी मराठी महा ज्योती संस्था मधील संशोधक विद्यार्थ्यांना पूर्वी सरसकट स्कॉलरशिप दिली जात होते.
याच दिवशी तिन्ही संस्थांमध्ये समान अशा प्रत्येकी 50 गुण देण्यात येतील. २१ ऑक्टोबर २०२३ च्या मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत समानतेच्या धोरणाखाली प्रत्येक संस्थेकडून 200 विद्यार्थी सीईटी परीक्षेद्वारे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. 17 डिसेंबर रोजी सिटी परीक्षा जाहीर करण्यात आली होती; परंतु त्याच दिवशी एम पी एस सी आणि परीक्षांमुळे ही परीक्षा 24 डिसेंबरला घेण्यात आली. या परीक्षेत 2019 चा सेट चा पेपर जशाचा तशा विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानंतर राज्यभर विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन आंदोलन केली.
याची दखल घेत सरकारने पुनर्परीक्षा 10 जानेवारी रोजी घेतली. या परीक्षेत एबीसीडी या कोडमधील ए आणि बी कोणता पेपर सीलबंद होता; परंतु सीआयडी पेपरची झेरॉक्स वरती विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्याला कोणताही प्रकारचे सील नव्हते आणि बी कोड चा पेपर गट्टा वेगळा तर सीडी कोड चा पेपर चा गटा वेगळा होता. दुसऱ्यांना घेण्यात आलेला परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाने ही परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप पूर्ण रकमेसह जाहीर करावी. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे आता तरी बंद करावे अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत
परीक्षा नको आता सरसकट फेलोशीप द्या, संतप्त विद्यार्थ्यांची मागणी
|