बातम्या

जुने स्वेटर फेकू नका, अशा प्रकारे वापरा

Dont throw away old sweaters use them this way


By nisha patil - 12/22/2023 7:37:20 AM
Share This News:




 हवामान बदलले की त्यानुसार आपण कपडे वापरतो. आपण सर्वजण थंडीच्या दिवसात स्वेटर घालतो. पण दरवर्षी आपण काही जुने स्वेटर फेकून देतो. हे स्वेटर एकतर आपल्याला बसत नाहीत किंवा आपल्याला ते घालावेसे वाटत नाहीत.काही लोकांची सवय असते एकदा घातलेले कपडे पुन्हा वापरत नाही. हिवाळ्यात देखील जुने आणि वापरलेले स्वेटर फेकण्यात येतात. पण जुने स्वेटर फेकण्याऐवजी अशा प्रकारे वापरता येतील. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
हेडबँड बनवू शकता -
आपल्याकडे जुने स्वेटर असल्यास, आपण त्यांच्या मदतीने  सुंदर हेडबँड बनवू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त स्वेटरच्या पट्ट्या कापून घ्याव्या लागतील. मग तुम्ही त्यातून हेडबँड तयार करा. ते अधिक स्टाइलिश बनविण्यासाठी, बटणे वापरा.
 
फुलदाणी कव्हर-
जुन्या स्वेटरच्या मदतीने तुम्ही फुलदाणीचे कव्हर ही बनवू शकता. यामुळे तुमच्या घरात ठेवलेली फुलदाणी आणखी सुंदर दिसते. फक्त स्वेटरने फुलदाणीभोवती सर्व कव्हर करून घ्या. मग तुम्ही ते सुतळी किंवा रिबनने पॅक करा. तुम्ही त्यात सुंदर फुले लावा आणि तुमच्या खोलीचे सौंदर्य वाढवा


जुने स्वेटर फेकू नका, अशा प्रकारे वापरा