बातम्या
डॉ. अनिल मडके हे साहित्य संमेलनातील परिसंवादासाठी निमंत्रित
By nisha patil - 2/14/2025 12:08:32 PM
Share This News:
डॉ. अनिल मडके हे साहित्य संमेलनातील परिसंवादासाठी निमंत्रित
सांगली : येथील छातीरोग विशेषतज्ज्ञ , जनस्वास्थ्यचे संपादक आणि साहित्यिक डॉ. अनिल मडके यांना दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून निमंत्रण मिळाले आहे. दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता' या विषयावरील परिसंवादासाठी डॉ. अनिल मडके यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन, लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून , पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मा. शरद पवार हे संमेलनाचे उद्घाटक आहेत.
डॉ. अनिल मडके यांची आजपर्यंत सहा पुस्तके प्रकाशित झाली असून, विविध साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयावरील परिसंवादात सहभागी झाले आहेत. त्यांनी अनेक काव्यसंमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. आरोग्य आणि इतर अनेक विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. दिल्ली येथील साहित्य संमेलनातील सहभागाचा बहुमान त्यांना यानिमित्ताने प्राप्त झाला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. अनिल मडके हे साहित्य संमेलनातील परिसंवादासाठी निमंत्रित
|