बातम्या
डॉ.अनुप्रिया गावडेची गरुड झेप रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज परीक्षेत ऑल इंडिया रँक
By nisha patil - 2/23/2024 1:12:28 PM
Share This News:
डॉ.अनुप्रिया गावडेची गरुड झेप रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज परीक्षेत ऑल इंडिया रँक
शांतिनिकेतन शाळेमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ग्रँडमास्टर भारत विभूषण संविधान कन्या प्रा. डॉ. अनुप्रिया अमितकुमार गावडे हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून सोळावा क्रमांक पटकावित कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या ह्या परीक्षेत संपूर्ण भारतातून लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. या परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल तिला सुवर्णपदक, रिकग्निशन लेटर आणि सर्टिफिकेट ऑफ मेरिट देऊन सन्मान करण्यात आला आहे. यापूर्वीही अनुप्रियाने अनेक क्षेत्रांमध्ये आपलं चमक दाखविले असून पाच विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. संविधान पाठांतराबरोबरच विश्व संस्थेच्या बाल हक्क अनुसंधान देखील तिला तोंड पाठ आहे. तिला संयुक्त राष्ट्रसंघ व इतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी मानद डॉक्टरेट व प्रोफेसरशिप देऊन गौरव केले आहे.
तिने ओलिंपियाड सारख्या अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये जगात पहिला येण्याचा मानही मिळवलेला आहे. आजपर्यंत तिने 50 सुवर्णपदकाला गवसणी घातली असून. पन्नास हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरावरील पारितोषिक आणि पुरस्कार मिळविले आहेत. ती भारताची लिटल सुपरस्पीकर असून, ऑल इंडिया स्पीच कॉम्पिटिशन मध्ये देखील तिने मास्टर ओरेटर होण्याचा मान पटकाविला आहे. शैक्षणिक कारकिर्दीसोबत क्रीडा स्पर्धेतही तिने उज्वल यश मिळवलेले असून रोप्य व रजत पदकाची ती मानकरी ठरली आहे ती अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांची ब्रँड आंबेसिडर असून संविधान व बालहक्क कायदा जाणीव जागृतीचे कार्य तसेच बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत समाजामध्ये रुजलेल्या अनिष्ट चालीरीती विरोधात अनेक कार्यक्रम हाती घेतले आहे. नुकतेच तिला फिलिपाईन्स देशाने चाइल्ड ॲम्बेसिडर म्हणूनही घोषित केले आहे. अशा बहुमुखी आयामाचे व्यक्तिमत्व कोल्हापूरच्या मातीत घडत असून तिच्या या चढणघडणीमध्ये तिच्या शाळेच्या संचालिका सौ राजश्री काकडे मॅडम, प्राचार्य जयश्री जाधव मॅडम, समन्वयक प्रीती नायर मॅडम व सर्व शिक्षकांचे मुलाचा हात आहे. ती प्रसिद्ध चार्टर्ड अमित कुमार गावडे व ग्लोबल टीचर प्रा. डॉ. अक्षता गावडे यांची कन्या आहे. या तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे
डॉ.अनुप्रिया गावडेची गरुड झेप रामानुजन मॅथेमॅटिक्स चॅलेंज परीक्षेत ऑल इंडिया रँक
|