बातम्या
डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या पसंतीत अग्रस्थानी
By nisha patil - 8/17/2024 6:42:44 PM
Share This News:
कोल्हापूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरीमध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीत अग्रस्थानी राहिले.अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तब्बल 83 % अलॉटमेंट झाल्याने उज्वल शैक्षणिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र सीईटी सेलकडून प्रथम फेरीची अलॉटमेंट बुधवारी जाहीर करण्यात आली. यावेळी, प्रथम प्रवेश घेणाऱ्या कु. श्वेता सुरेश जाधव या विद्यार्थिनीचे स्वागत संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी केले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच आधुनिक तंत्रशिक्षण, मॉक इंटरव्यू अँड प्लेसमेंट मार्गदर्शन, इन्स्टिट्यूट इंडस्ट्री कनेक्ट, कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग, डिजिटल लायब्ररी, कौशल्य विकास केंद्र, आंत्रेप्रोन्यूअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, एक्सपर्ट लेक्चर्स , नॅशनल इव्हेंट्स असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांची सर्वदूर प्रसिद्धी अगदी अल्पावधीतच झाली. परिणामी, यावर्षीच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटवर विश्वास व्यक्त करून प्रवेशासाठी अग्रस्थानी पसंती दिली. याप्रसंगी बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी " जॉब सिकर नव्हे, तर जॉब गिव्हर इंजिनियर घडविणे हे इन्स्टिट्यूटचे मुख्य ध्येय असून त्यासाठी आवश्यक सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावीत यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्थेच्या तंत्रनिकेतनने बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट दिल्या आहेत. महाविद्यालय स्तरावर आणखी मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट होतील" असे प्रतिपादन केले. "भविष्याचा वेध घेऊन नेहमी दर्जेदार सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात इन्स्टिट्यूट अग्रेसर असते, त्यामुळेच विद्यार्थ्यांची आम्हास पसंती मिळाली" असे प्रतिपादन संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी केले. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सर्वच शाखांना उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
याप्रसंगी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी 'तंत्रकुशल अभियंता हा चारित्र्यसंपन्न नागरिक बनेल यासाठी सुद्धा इन्स्टिट्यूट प्रयत्नशील असल्याचे' आग्रहाने नमूद केले. प्रवेशप्रक्रिया प्रमुख प्रा. प्रवीण देसाई, सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी प्रवेशप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या पसंतीत अग्रस्थानी
|